पुणे जिल्ह्यातील पाच तालुके अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:10 AM2021-07-17T04:10:22+5:302021-07-17T04:10:22+5:30
पुणे : पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी दहावी परीक्षेचा निकालात बाजी मारली आहे. जुन्नर, आंबेगाव, बारामती, इंदापूर आणि ...
पुणे : पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांनी दहावी परीक्षेचा निकालात बाजी मारली आहे. जुन्नर, आंबेगाव, बारामती, इंदापूर आणि वेल्हा तालुक्यातील सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर पुणे शहर पूर्वचा ९९.९५ टक्के तर पुणे शहर पश्चिमचा निकाल ९९.९२ टक्के, तसेच पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९९.९२ टक्के लागला आहे.
कोरोनामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शासन निणयातील मूल्यमापन कार्यपद्धतीतील तरतुदीनुसारा नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन, तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्याथ्याना विषयानिहाय गुणदान करण्यात आले आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
तसेच माध्यमिक शाळांना ताेंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेणे शक्य व्हावे. यासाठी मंडळाच्या वतीने विशेष मार्गदशक सूचना देण्यात आल्या होत्या. परीक्षेत भाषेसाठी २० गुणांची तोंडी परीक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा तसे सामाजिक शास्त्रे आणि गणित या विषयांसाठी प्रत्येकी २० गुणांची अंतर्गत परीक्षा घेण्यात आली आहे.
जुन्नर तालुक्यातून ५ हजार ३५२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी सर्वच पास झाल्याने निकाल १०० टक्के लागला आहे.
आंबेगाव तालुक्यातून ३ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी सर्वच पास झाल्याने निकाल १०० टक्के लागला आहे.
बारामती तालुक्यातून ६ हजार २६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी सर्वच पास झाल्याने निकाल १०० टक्के लागला आहे.
इंदापूर तालुक्यातून ६ हजार १८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी सर्वच पास झाल्याने निकाल १०० टक्के लागला आहे.
वेल्हा तालुक्यातून ६७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी सर्वच पास झाल्याने निकाल १०० टक्के लागला आहे.
भोर तालुक्यातून २ हजार २२८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २ हजार २२६ विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. २ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहेत.
दौंड तालुक्यातून ५ हजार ६३० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ६२९ विद्याथी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९८ टक्के लागला आहे. १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.
हवेली तालुक्यातून १३ हजार ६३३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ६२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९७ टक्के लागला आहे. ५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
खेड तालुक्यातून ६ हजार ७०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार ६९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.८९ टक्के लागला आहे. ८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
मावळ तालुक्यातून ५ हजार ५१ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. ३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
मुळशी तालुक्यातून ३ हजार १४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.
पुरंदर तालुक्यातून ३ हजार ८४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ३ हजार ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.
शिरूर तालुक्यातून ६ हजार १६५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार १६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९६ टक्के लागला आहे. १ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे.
पुणे शहर पूर्व भागातून २३ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ९७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. १३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
पुणे शहर पश्चिम भागातून १९ हजार ८९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ८८० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. १५ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
तर पिंपरी-चिंचवड शहरातून १९ हजार ३७३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ३५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९९.९२ टक्के लागला आहे. एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. १६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.