स्मार्ट ग्राम स्पर्धेत सपकळवाडी जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:16 AM2021-02-17T04:16:22+5:302021-02-17T04:16:22+5:30
गावात वेगवेगळे उपक्रम राबवत तत्कालीन सरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांनी केलेल्या उल्लेखनीय गावच्या विकासाबाबत शासनाच्या ...
गावात वेगवेगळे उपक्रम राबवत तत्कालीन सरपंच व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांनी केलेल्या उल्लेखनीय गावच्या विकासाबाबत शासनाच्या वतीने हा पुरस्कार मिळाला आहे.
पन्नास लाख रुपये गावाच्या विकासासाठी या पुरस्कारातून बक्षीस मिळणार आहे स्वच्छता व्यवस्थापन दायित्व पर्यावरण नागरिकांना पुरविणाऱ्या सेवा या बाबींवर जिल्हा स्तरावरील समितीने गुणांकन करून सपकळवाडी ला पुणे जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराचे इंदापूरचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्ताराधिकारी किरण मोरे, वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता एम. व्ही. सुळ यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच रोहिणी सोनवणे,उपसरपंच सचिन सपकळ, शिवाजी सपकळ, नामदेव भुजबळ, शत्रुघ्न घाडगे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष तुषार सपकळ, महेश सपकळ यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
फोटो ओळ- पुरस्कार वितरण करताना गट विकास अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ.