बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 03:08 AM2018-09-16T03:08:56+5:302018-09-16T03:09:29+5:30

आरोपीच्या आईने दिली होती पीडितेच्या कुटुंबीयांना जगू न देण्याची धमकी

Torture on sisters; Youth education | बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा

बहिणींवर अत्याचार; तरुणास शिक्षा

Next

पुणे : खेळण्यासाठी परिसरातील एका घरात जात असलेल्या दोन अल्पवयीन बहिणींवर अत्याचार करणाऱ्या १९ वर्षीय आरोपीला न्यायालयाने १२ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यातील मोठ्या बहिणीवर वारंवार बलात्कार तर छोटीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला होता. ही बाब आईवडिलांना सांगितली, तर त्यांना मारून टाकण्याची धमकी देत त्याने मुलींवर अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली या अल्पवयीन असून त्यातील मोठ्या मुलीचे वय १० आणि छोट्या मुलीचे वय ८ आहे. अकबर इमाम शेख (वय १९, रा. किराड गल्ली, भवानी पेठ) असे शिक्षा देण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलींच्या आईने खडक पोलिसांत फिर्याद दिली होती. २९ आॅक्टोबर २०१५ रोजी हा प्रकार उघड झाला होता.
घटनेच्या दिवशी फिर्यादी यांची छोटी मुलगी ही शेख याच्या घरी खेळण्यासाठी गेली होती. त्यावेळी फिर्यादी या घरातील कामे करीत होत्या. त्यांना अचानक मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला म्हणून त्या शेख याच्या घरात गेल्या. त्यावेळी शेख पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी पाहिले. फिर्यादी यांनी त्वरित मुलीची सुटका केली आणि तिला घरी घेऊन गेल्या.
रात्रीच्या वेळी फिर्यादी यांनी ही बाब पतीला सांगितली. त्यानंतर त्यांनी मोठ्या मुलीला विश्वासात घेऊन शेख याच्याबाबत विचारणा केली. त्यावेळी तिच्याकडून देखील सुमारे २० दिवसांपासून अकबर घरी खेळण्यासाठी गेल्यानंतर अत्याचार करीत असल्याची माहिती मिळाली. ही बाब आईवडिलांना सांगितली तर त्यांना जिवे मारण्याची धमकी त्याने मुलींना दिली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार शेख याला अटक करून त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी सहायक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. राजेश कावेडिया यांनी ५ साक्षीदार तपासले. त्यातील पीडित मुलींची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचा युुक्तिवाद लक्षात घेत न्यायालयाने शेख याला १२ वर्षे सक्तमजुरी आणि ४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावणी. दंडाची रक्कम न भरल्यास ४ महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.

शेखच्या आईलाही शिक्षा
अकबर याने केलेल्या प्रकाराबद्दल पीडित मुलींचे आईवडील त्याची आई शेहनाझ इमान शेख हिच्याकडे जाब विचारला. त्या वेळी तुम्हाला येथे राहायचे असेल तर गप्प बसा, नाहीतर मुलींना घेऊन दुसरीकडे जा. याबाबत, पोलिसांत तक्रार केली तर तुम्हाला जगू देणार नाही, अशी धमकी दिली होती. याप्रकरणात तिला दोषी ठरवत न्यायालयाने १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास तिला एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.

Web Title: Torture on sisters; Youth education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.