इंदापूर तालुक्यात एकूण २६७ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:12 AM2021-04-21T04:12:25+5:302021-04-21T04:12:25+5:30
इंदापूर तहसील कार्यालयाचे निवासी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची सुरवात इंदापूर तालुक्यात झाल्यापासून आज पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये ...
इंदापूर तहसील कार्यालयाचे निवासी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची सुरवात इंदापूर तालुक्यात झाल्यापासून आज पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी जे शासनाने निर्बंध घालून दिले आहेत, ते तंतोतंत पाळले पाहिजेत, अन्यथा या आजारास बळी पडावे लागणार आहे. कोरोना रुग्ण वाढण्याचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे आपले कुटुंब कोरोना मुक्त ठेवण्यासाठी घराबाहेर अत्यंत महत्त्वाच्या कामाशिवाय पडू नये. तरच ग्रामीण भागात प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होईल अशी माहिती निवासी तहसीलदार ठोंबरे यांनी दिली.
२० एप्रिल रोजी जवळपास १५० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील तीन रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोणतेही गावातील नागरिकाला छोटे मोठे आजार असतील तर लपवून ठेवू नका योग्य वेळी तपासणी करा व इंदापूर तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन निवासी तहसीलदार ठोंबरे यांनी केले आहे.