पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण ओव्हरफ्लो
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:19 PM2019-07-01T14:19:00+5:302019-07-01T14:19:14+5:30
लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी धरण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले.
लोणावळा : लोणावळा शहरातील पावसाळी पर्यटनांचे आकर्षण बिंदू असलेले भुशी धरण आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाले. धरण फुल होऊन सांडव्यावरुन पाणी वाहू लागल्याने परिसरातील व्यावयिकांनी एकच जल्लोष केला.
तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मॉन्सूनने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो झाले. तीन दिवसात शहरात ४५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
संततधार कोसळणार्या पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागल्याने डोंगरातून येणार्या या पाण्यामुळे अवघ्या तिनच दिवसात धरण पुर्ण भरुन सांडव्यावरुन पाणी वाहू लागले. आज सोमवार असताना देखिल धरण परिसरात आलेल्या पर्यटकांना धरणाच्या पायर्यांवर बसून भिजण्याचा आनंद घेता आला. धरणाच्या पायर्यांवर लावण्यात आलेल्या लाकडी फळ्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले असून तदनंतर पायर्यांवरुन मोठ्या प्रमाणात वाहण्यास सुरुवात होणार आहे.