Torna fort : तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:50 IST2025-02-09T13:45:33+5:302025-02-09T13:50:47+5:30
शिंदे तोरणा गडावर ट्रेक साठी गेले असताना गडावर हृदय विकाराचा झटका आल्यामुळे मयत झाले.

Torna fort : तोरणा किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वेल्हे - तोरणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रणजित मोहनदास शिंदे (वय ४३, रा. वारजे, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे ट्रेकिंगसाठी तोरणा किल्ल्यावर गेले होते. मात्र, गड चढताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तानाजी भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात शव किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत सुरक्षितरित्या आणले. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.