मराठी अभिजातच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:16 AM2017-08-01T04:16:15+5:302017-08-01T04:16:15+5:30
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी सर्वच स्तरांमधून होत असताना शासनाने त्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे.
पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी सर्वच स्तरांमधून होत असताना शासनाने त्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकले आहे. पंतप्रधान कार्यालयाने सांस्कृतिक खात्याला दिलेल्या आदेशानुसार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत एक सुधारित कॅबिनेट नोट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यातली अडचण दूर झाली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
या पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी
यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्यात
मसापने प्रथम पुढाकार घेतला.
याबाबत परिषदेने पुण्यात लेखकांची बैठक घेतली होती. परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यातील
आणि इतर शाखांच्या वतीने पंतप्रधानांना एक लाखाहून
अधिक पत्रे पाठविण्यात आली
होती. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाबाबत
ठाम भूमिका घ्यावी, यासाठी मसापच्या शिष्टमंडळाने
घेतलेली आक्रमक भूमिका, या सर्वांचा परिणाम चांगला
झाला आहे.’’