फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:36 PM2019-03-02T12:36:06+5:302019-03-02T12:43:28+5:30

महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे.

TP Scheme Approval at Fursungi and Uuruli | फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी 

फुरसुंगी आणि ऊरुळी देवाची येथील टीपी स्कीमला महापालिकेची मंजुरी 

googlenewsNext
ठळक मुद्देबाह्यवळण मार्ग : नव्याने समाविष्ट झालेल्या अकरापैकी दोन गावांचा समावेशही गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होण्यापुर्वी पीएमआरडीएने याबाबतचा आराखडा केला होता तयार संबंधित जमीन मालकांनी या योजनेला संमती दर्शविली असून या योजनेसाठी इरादा जाहीर केला जाणार

पुणे : पीएमआरडीएकडून पुण्याभोवती तयार करण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या टप्प्यात येत असलेल्या दोन गावांमध्ये महापालिका तीन ठिकाणी टीपी स्किम राबविणार आहे. उरुळी देवाची येथे एक तर फुरसुंगीमध्ये दोन ठिकाणी ही योजना राबविण्यात येणार आहे. पालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये या टीपी स्किमचा इरादा जाहीर करण्यास मंजुरी देण्यात आली.
महापालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. पीएमआरडीएचा प्रस्तावित रिंग रोड या अकरा गावांपैकी असलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगीमधून जात आहे. या गावांमध्ये तीन ठिकाणी टीपी स्किम राबविण्यात येणार असून त्यासाठी पीएमआरडीएकडून तांत्रिक मदत (टेक्निकल सपोर्ट) घेतली जाणार आहे. ही गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट होण्यापुर्वी पीएमआरडीएने याबाबतचा आराखडा तयार केला होता. तो आराखडा महापालिकेला सुपुर्द करण्यात आला.   त्यानुसार प्रशासनाने टिपी स्किम करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. संबंधित जमीन  मालकांनी या योजनेला संमती दर्शविली असून या योजनेसाठी इरादा जाहीर केला जाणार आहे. फुरसुंगी गावामधील सुमारे ३९ किमी लांबीच्या आणि उरुळी देवाची येथील ७३० मीटर लांबीच्या रस्त्याची जागा विना मोबदला प्राप्त होणार आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. जमिनधारकांसोबत भागीदारी पध्दतीने नियोजन करून परिसराचा सुनियोजित विकास करुन वाहतूक कोंडी, पाणी व इतर समस्या सोडविता येणार आहेत. यासंबंधीच्या प्रस्तावाला शहर सुधारणा समितीने मंजुरी दिलेली होती. 
 ====
गाव                                                           क्षेत्र
क्षेत्र उरुळी देवाची (टीपीएस क्र. ६)        १०८ हेक्टर 
फुरसुंगी (टीपीएस क्र. ९)                       २६२ हेक्टर 
फुरसुंगी (टीपीएस क्र. १०)                    ३०२ हेक्टर 
 ====
इरादा जाहीर केल्यांतर स्थानिक पातळीवर चर्चा करून प्रा-रूप आराखडा तयार केला जाणार असून हा आराखडा सर्वसाधारण सभेमध्ये मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. स्कीमसाठी कालावधी निश्चित करण्यात येणार असल्याचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी यावेळी सभेसमोर सांगितले. 

Web Title: TP Scheme Approval at Fursungi and Uuruli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.