वाळूतस्करांचे धाबे दणाणले, जेसीबी मशीनसह ट्रॅक्टर व ट्रकवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:42+5:302021-03-23T04:10:42+5:30

शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरू असल्याबाबतचे वृत्त लोकमतने दिले . घोडनदी पात्रात कारवाई वाळूउपसा करीत १७ बोटी उद्ध्वस्त ...

Traces of sand smugglers, tractor and truck with JCB machine | वाळूतस्करांचे धाबे दणाणले, जेसीबी मशीनसह ट्रॅक्टर व ट्रकवर कारवाई

वाळूतस्करांचे धाबे दणाणले, जेसीबी मशीनसह ट्रॅक्टर व ट्रकवर कारवाई

Next

शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरू असल्याबाबतचे वृत्त लोकमतने दिले .

घोडनदी पात्रात कारवाई वाळूउपसा करीत १७ बोटी उद्ध्वस्त केल्यामुळे वाळूतस्करांना मोठा दणका बसला आहे. त्याच पाठोपाठ शेख यांनी मध्यरात्री टाकळी हाजी व कवठे येमाई दरम्यान घोडनदी पात्रात धाडसी कारवाई करीत वाळूउपसा करणाऱ्या एका पोकलॅन्ड मशिनसह एक टॅक्टर व वाळूची गाडी पकडण्यात आली असून वाळूतस्कर मात्र फरार झाले आहेत . या कारवाईमुळे बेट भागातील वा‌ळूतस्करांची धाबे दणाणली आहेत . या कारवाईत मंडल अधिकारी यू. एन . फुंदे, तिर्थगिरी गोसावी, तलाठी के. एम. जाधव, एस. बी. शिंदे, दशरथ रोडे, हे सहभागी झाले होते .

तहसीलदार लैला शेख म्हणाल्या की, वाळूतस्करांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल तसेच यामधे करण्यात आलेला दंड न भरल्यास मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे. ज्या गौण खनिज उपसा करणाऱ्यांना दंडाचे आदेश झालेले आहे त्यांनी त्वरित दंड जमा करावे. .

महसूल विभागाने कारवाई करीत पकडलेल्या वाळूची गाडी पळून नेत खाली केल्या प्रकरणी तहसीलदार यांनी ठोस भूमिका घेत सहा आरोपीच्या वर गुन्हा दाखल केला. एका सत्ताधारी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या ला अटक झाली असून ते एका अभ्यासू आमदारांचे नाव घेत शिरूरमधे पोलीस स्टेशन महसूलमधे दलाली करीत सामान्य माणसाला वेठीस धरीत असत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे . या राजकीय दलाला आशीर्वाद कुणाचा ही चर्चा तालुक्यात सुरु आहे .

वाळूच्या मशीनसह तहसीलदार लैला शेख व कर्मचारी ..

Web Title: Traces of sand smugglers, tractor and truck with JCB machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.