बाजार समिती सुधारित विधेयकास कामगार संघटनेचा विरोध; पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये सोमवारी शुकशुकाट

By अजित घस्ते | Published: February 26, 2024 03:45 PM2024-02-26T15:45:45+5:302024-02-26T15:46:09+5:30

माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी मार्केट बंद

Trade Union Opposition to Market Committee Amendment Bill; Shukshukat on Monday in the market yard of Pune | बाजार समिती सुधारित विधेयकास कामगार संघटनेचा विरोध; पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये सोमवारी शुकशुकाट

बाजार समिती सुधारित विधेयकास कामगार संघटनेचा विरोध; पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये सोमवारी शुकशुकाट

पुणे : बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे. तसेच माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. या मागणीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटनांनी साेमवारी मार्केटयार्ड मधील फळबाजार, पालेभाज्या बाजार बंद पाळला. याबंदमुळे मार्केट यार्डातील सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाले.

राज्यभरातील कामगार संघटनांनी बाजार समितीच्या आवारातील फळबाजार सोमवारी बंद पाळला. त्यामुळे राज्यातील बहुतांश बाजार समितीच्या आवारात शेतीमालाच्या आवकवर परिणाम झाला आहे. परराज्यातील शेतीमालाची आवक झाली नाही. मात्र, पुणे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. बंदमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार विविध संघटना सहभागी झाल्याने पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी सांगितले.

माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून निवेदन दिले आहे.

Web Title: Trade Union Opposition to Market Committee Amendment Bill; Shukshukat on Monday in the market yard of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.