ट्रेडमार्कचे उल्लंघन ‘सिरम’कडून नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:14+5:302021-01-20T04:13:14+5:30
पुणे : ‘क्युटीस बायोटिक’ने एप्रिल २०२० मध्ये ट्रेडमार्कबाबत केलेला अर्ज हा सॅनिटायझर आणि इतर उत्पादनांबाबत होता. त्यांनी लशीच्या नावाबाबत ...
पुणे : ‘क्युटीस बायोटिक’ने एप्रिल २०२० मध्ये ट्रेडमार्कबाबत केलेला अर्ज हा सॅनिटायझर आणि इतर उत्पादनांबाबत होता. त्यांनी लशीच्या नावाबाबत डिसेंबर २०२० मध्ये अर्ज केला आहे. पण ‘सिरम’ने लशीच्या ट्रेडमार्कबाबत जून २०२० मध्येच अर्ज केला होता. त्या बाबतची प्रक्रिया मार्च २०२० मध्ये सुरू केली होती. त्यामुळे ‘सिरम’ने ट्रेडमार्क व पासिंग ऑफ नियमांचे उल्लंघन केले नसल्याचा दावा सिरमच्या वकिलांनी न्यायालयात केला.
‘क्युटीस बायोटिक’ने या संदर्भात नांदेडमध्ये दाखल केलेल्या दाव्याची कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. ती आम्ही न्यायालयास दिली आहेत, असा युक्तिवाद ‘सिरम’तर्फे वकील अँड. एस. के. जैन यांनी मंगळवारी (दि. १९) केला.
‘सिरम’च्या लशीच्या नावावर ‘क्युटीस बायोटिक’ या कंपनीने हरकत घेतली आहे. मात्र सॅनिटायझर विकणे आणि लस विकणे यात फरक असल्याने त्यांचे म्हणणे योग्य नाही, असे ऍड. जैन यांनी न्यायालयात सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ जानेवारीला होणार आहे.