मंचर बाजारातील व्यवहार सुरळीत सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:11 AM2021-09-26T04:11:31+5:302021-09-26T04:11:31+5:30
--------- मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व उपबाजारात यापुढील काळात व्यवहार सुरू केले जातील. पुढील वार्षिक सभेमध्ये ...
---------
मंचर : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व उपबाजारात यापुढील काळात व्यवहार सुरू केले जातील. पुढील वार्षिक सभेमध्ये सर्वाधिक शेतमालाचा पुरवठा करणारे शेतकरी यांचा सन्मान केला जाईल, अशी माहिती सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निकम बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, सभापती संजय गवारी, बाळासाहेब बाणखेले, अनिल वाळुंज, बाजार समितीचे उपसभापती संजय शेळके, संचालक सखाराम काळे, बाळासाहेब बाणखेले, गणपतराव इंदोरे, अशोक डोके, शिवाजी निघोट, बाळासाहेब मेंगडे, सागर थोरात, विलास गांजाळे, प्रमोद वळसे, देहू कोकाटे, ज्ञानेश्वर घोडेकर, मयूरी शिंगाडे, अरुण बाणखेले, आदी उपस्थित होते.
देवदत्त निकम म्हणाले, बाजार समितीने शेतकऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजार समितीला जो वाढावा मिळत आहे. त्यामधून बाजार आवारात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. इतर बाजार घटकांना माफक दरात पोटभर जेवण मिळावे यासाठी तीस रुपयांत पोटभर जेवण दिले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे म्हणाले, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व संस्था प्रगतिपथावर आहे. बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम व संचालकांनी शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत सभापती संजय गवारी, रमेश खिल्लारी, बाळासाहेब काळे, आदींनी सहभाग घेतला. सहायक सचिव सचिन बोराडे यांनी अहवाल वाचन केले. संचालक दत्तात्रेय हगवणे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपसभापती संजय शेळके यांनी आभार मानले.
--
फोटो क्रमांक : २५ मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती
फोटो खाली : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना सभापती देवदत्त निकम.