ट्रेडिंगच्या नाद पडला महागात! अवघ्या दीड महिन्यात गमावले २२ लाख रुपये
By भाग्यश्री गिलडा | Published: April 8, 2024 03:12 PM2024-04-08T15:12:23+5:302024-04-08T15:13:54+5:30
याप्रकरणी रविवारी (दि. ७) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे...
पुणे : ट्रेंडिंगच्या नादात एका युवकाने अवघ्या दीड महिन्यात तब्बल २२ लाख रुपये गमावल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी (दि. ७) हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १ फेब्रुवारी ते ७ एप्रिल २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. मयूर अरविंद मकवाना (व- ३६, रा. हडपसर) यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्ह्टल्याप्रमाणे सायबर चोरट्याने व्हॅट्सऍपवरून मयूर यांना संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग मध्ये गुंतवून केल्यास चांगले परतावा मिळेल असे आमिष दाखवले.
महिलेने पैसे गुंतवण्यास होकार दिल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाटसअप ग्रुप जॉईन करायला सांगितले. महिलेने व्हात्साप्प ग्रुप जॉईन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करायला सांगितले. यात फिर्यादी यांनी अप्लिकेशन डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र तिवारी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी सेबीची आणि मिळालेला नफा आणि पैसे मिळणार नाही अशी भीती दाखऊन आणखी पैसे भरायला सांगितले.
मात्र पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तक्रारदार महिलेने सायबर चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुप वरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर चोरटे करत आहेत.