फॅशन शोमधून परंपरा, आधुनिकतेचा मिलाफ
By admin | Published: April 30, 2015 12:38 AM2015-04-30T00:38:31+5:302015-04-30T00:38:31+5:30
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) महाविद्यालयाच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे : विविध संकल्पना, रचना तसेच हस्तकलांचा वापर करीत पर्यावरणपूरक कपड्यांची केलेली निर्मिती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मॉडेलचा सहभाग, मेहनतीचे चीज होताना बघून विद्यार्थिनींनी केलेला कल्ला आणि त्याच्या जोडीला परंपरा व आधुनिकतेचा अनोखा मिलाफ यांनी परिपूर्ण असलेला फॅशन शो रंगला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जाधवगढ येथे.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल आॅफ फॅशन टेक्नॉलॉजी (सॉफ्ट) महाविद्यालयाच्या वतीने फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भारतातील नामवंत फॅशन डिझाईनर हेमांग अग्रवाल, प्रसिद्ध फॅशन डिझाईनर केन फर्न्स, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिद्ध वरिष्ठ फॅशन जर्नालिस्ट मेहेर कॅसलिनो, अरविंद लाईफस्टाईलचे मेहुल पांचोली, यूकेमधील प्रसिद्ध फॅशन डिझाईनर बेन रॅम्सडेन, इटलीमधील प्रसिद्ध फॅशन डिझाईनर साशा परीक्षक म्हणून उपस्थित होते.
पर्यावरणपूरक फॅशन ही मुख्य संकल्पना घेऊन महाराष्ट्र माझा व इको लक्झरी या संकल्पनेवर आधारित या फॅशन शोमध्ये डिझायनिंगच्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी १६ विविध संकल्पनांवर आधारित केलेली वस्त्रप्रावरणे या फॅशन शोमध्ये सादर करण्यात आली.
फॅशन कोरिओग्राफर वहबीझ मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली या फॅशन शोमध्ये पार्वती ओमनीकुट्टन, कँडीस पिंटो, सुचेता शर्मा सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)
यांना मिळाले पारितोषिक
४फॅशन डिझाईन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ब्लेम द ब्लूम या संकल्पनेवर आधारित फॅशन कलेक्शनला मेंटर अॅवॉर्ड, गोल्डन एज या फॅशन कलेक्शनला बेस्ट कलेक्शन अॅवॉर्ड मिळाले. तर, शर्टीझम या कलेक्शनला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक फॅशन कलेक्शन अॅवॉर्ड मिळाले.
४ फॅशन डिझाईन अँड क्लोदिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या अॅन इंडिजीनीअस एपिक या संकल्पनेवर आधारित फॅशनला मेंटर अॅवॉर्ड, रिफ्लेक्टीव्ह रिफॉर्मेशन या फॅशन कलेक्शनला बेस्ट कलेक्शन अॅवॉर्ड आणि कोड आॅफ लव्ह या फॅशन कलेक्शनला सर्वोत्कृष्ट व्यावसायिक फॅशन क्लेक्शन अॅवॉर्ड म्हणून परीक्षकांची पसंंती मिळाली.