राज्यात व्यापाऱ्यांचा १६ जुलैला लाक्षणिक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:32+5:302021-07-08T04:09:32+5:30
पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका ...
पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तसेच या कायद्यात आता राज्य सरकार देखील बदल करत आहे. त्याचा देखील व्यापाऱ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यात येत्या १६ जुलैला लाक्षणिक बंद पुकारला आहे, अशी माहिती दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली. यावेळी या दिवशी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.
व्यापारी प्रतिनिधींची फेडरेशन आणि कॅमिट मुंबई यांच्यावतीने ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. वालचंद संचेती आणि मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, वाशी, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, नगर, मनमाड, मोडनिंब, दौंडाई, अमरावती आणि नांदेडसह विविध भागांतील व्यापारी या बैठकीत सहभागी झाले होते.