वालचंदनगरमध्ये पारंपरिक वेषभूषा स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:14 AM2021-02-16T04:14:10+5:302021-02-16T04:14:10+5:30
वालचंदनगर येथील सन्मती महिला मंडळाने आयोजित केलेल्या पारंपरिक वेषभूषा स्पर्धेत मुली आणि महिलांच्या तीन गटात ५०हुन अधिक स्पर्धक ...
वालचंदनगर येथील सन्मती महिला मंडळाने आयोजित केलेल्या पारंपरिक वेषभूषा स्पर्धेत मुली आणि महिलांच्या तीन गटात ५०हुन अधिक स्पर्धक सहभागी झाले
होते. लहान गटात श्रीया कंदले, मध्यम गटात सौम्या कंदले आणि मोठ्या गटात प्रीती दोशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने या स्पर्धा सन्मती मंडळाच्या सभागृहात घेण्यात आल्या होत्या.
यावेळी बोलताना डाॅ. रीता दगडे म्हणाल्या की, ‘कोरोनाच्या काळातील संसर्ग अद्यापही संपलेला नाही. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी
घेण्याबरोबर कुटुंबाची काळजी घ्यावी. सरकारकडून उपलब्ध होइल त्यानुसार लसीकरण करावे. कुटुंबाचा आधार म्हणून महिलांची जबाबदारी मोठी आहे.त्यांना
संधी मिळाली तर सर्वच क्षेत्रात विशेष प्रावीण्य दाखविण्यात महिला मागे नाहीत, असे डॉ. दगडे म्हणाल्या.
यावेळी निकिता दोभाडा यांनी सूत्रसंचालन केले.
--
फोटो क्रमांक : १५ वालचंदनगर ट्रॅडिशनल डे
फोटो ओळी:- वालचंदनगर येथे पारंपरिक वेशभूषा स्पर्धा उत्साहात पार पडली.