Pune Navratri Festival: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील तीन ठिकाणी वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 12:33 PM2023-10-15T12:33:23+5:302023-10-15T12:34:48+5:30

भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे, यादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी बदल

Traffic changes at three places in the city on the occasion of Navratri festival | Pune Navratri Festival: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील तीन ठिकाणी वाहतुकीत बदल

Pune Navratri Festival: नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील तीन ठिकाणी वाहतुकीत बदल

पुणे: आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे वाहतूक शाखेने शहरातील चतु:शृंगी मंदिर, भवानी माता मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिर या तीन ठिकाणच्या वाहतुकीत बदल केला आहे. भाविकांना सुखरूपपणे दर्शन घेता यावे, यादरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या सूचनेवरून खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

आप्पा बळवंत चौक 

आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौकाकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असून, बुधवार चौक ते आप्पा बळवंत चौक अशी एकेरी वाहतूक सुरू राहील. पर्यायी मार्ग - आप्पा बळवंत चौक, गाडीतळ पुतळा येथून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जाता येईल.

भवानी माता मंदिर

रामोशी गेट चौक ते जुना मोटार स्टॅण्ड यादरम्यानचा भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनांना दोन्ही बाजूंनी बंद करण्यात येणार असून, या महात्मा फुले रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. वाहन चालकांनी पंडित नेहरू रोडवरील व इतर रोडवरील पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करावीत.

पर्यायी मार्ग 

१) संत कबीर चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकाकडून भवानी माता रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी ए.डी. कॅम्प चौकातून डावीकडे वळून भारत सिनेमा पद्मजी चौकी येथून उजवीकडे वळून जुना मोटार स्टॅण्डपर्यंत येऊन इच्छितस्थळी जावे.
२) ढोले पाटील चौक बाजूने येऊन रामोशी गेट चौकीसमोरून भवानी माता मंदिर रस्त्यावरून जुना मोटार स्टॅण्डकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी भगवान बाहुबली चौकातून जुना मोटार स्टॅण्डकडे जावे.
३) रामोशी गेट येथून जाणारी पीएमपी बसेसची वाहतूक सेव्हन लव्ह चौक येथून डावीकडे वळून गोळीबार मैदान चौक, डावीकडे वळून खाणेमारुती चौक अशी सुरू राहील. जेणेकरून नवरात्र उत्सवादरम्यान भवानी माता मंदिर या भागात वाहतूककोंडी होणार नाही.
४) सेव्हन लव्ह चौकातून येणारी वाहतूक गोळीबार मैदानाकडे वळविण्यात यावी. मालधक्का चौकाकडून येणारी वाहतूक आरटीओ - पुणे स्टेशन - डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी वळविण्यात यावी. बोल्हाई चौकातून जाणारी वाहतूक मालधक्का चौक येथे वळविण्यात यावी.

तांबडी जोगेश्वरी मंदिर

१) लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर दरम्यान तांबडी जोगेश्वरी रस्त्यावर प्रवेश बंद.
२) सकाळ प्रेसकडून जोगेश्वरी मंदिराकडे जाण्यास अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारचे वाहनांस प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग : लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकात येऊन जोगेश्वरी मंदिराकडे वळण घेणाऱ्या वाहन चालकांनी सरळ सेवासदन चौक उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने आप्पा बळवंत चौक उजवीकडे न वळता सरळ शनिवारवाडा मार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.

नो-पार्किंग

१) तांबडी जोगेश्वरी, ३३ बुधवार पेठ
२) अष्टभुजा देवी मंदिर, ४२४ शनिवार पेठ
३) अष्टभुजा दुर्गादेवी, ६२४, नारायण पेठ या ठिकाणी नवरात्रोत्सवातील १० दिवसांसाठी अत्यावश्यक सेवा वगळता आवश्यकतेप्रमाणे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पार्किंग बंद करण्यात आली आहे. तसेच यापूर्वी या रस्त्यांवर असणारी पार्किंग व्यवस्था नमूद कालावधीसाठी स्थगित करण्यात येत आहे.

याठिकाणी पार्क करावीत वाहने...

१) टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचे नदीपात्रातील रस्त्यावर
२) मंडई येथील मिनर्व्हा व आर्यन / कै. सतीश मिसाळ पार्किंग तळावर
३) या भागातील रस्त्यांवरील पार्किंग झोनमध्ये
४) चतुःश्रृंगी माता मंदिर

 

Web Title: Traffic changes at three places in the city on the occasion of Navratri festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.