भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी वाहतुकीत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:19 IST2025-01-30T09:19:28+5:302025-01-30T09:19:52+5:30

गहुंजे परिसरात ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गांचा करा वापर

Traffic changes for India vs England cricket match | भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी वाहतुकीत बदल

भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट सामन्यासाठी वाहतुकीत बदल

पिंपरी : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी २० क्रिकेट सामना ३१ जानेवारी रोजी गहुंजे येथे होणार आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर गहुंजे परिसरातील वाहतुकीत बदल केला आहे. व्हीव्हीआयपी / व्हीआयपी / इतर अत्यावश्यक सेवा असा वाहनाचा पास असलेल्या वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात येत आहे.

मुंबईकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग 

- द्रुतगती मार्गाच्या देहूरोड एक्झिटमधून डावीकडे वळावे त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून द्रुतगतीमार्गालगतच्या मामुर्डीगावाच्या बाजूस असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जावे.

- द्रुतगती मार्गावरून येणारी वाहने किवळे पुलावरून मुकाई चौक येथून यू टर्न घेऊन कृष्णा चौक मार्गे द्रुतगतीमार्गालगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजुकडील सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाणाऱ्या मागाने जातील.
- शितलादेवी मंदिर येथून डाव्या बाजूस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सेवा रस्त्याने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जावे.
- सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे पुलाखालून कृष्णा हॉटेल शेजारून मामुर्डी अंडरपासच्या डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
- जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेऊन साई नगर फाटा मार्गे पार्किंग ठिकाणी जातील.

मनाई - जुना मुंबई - पुणे महामार्गाने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर महामार्गावरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणाऱ्या प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदिर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी.

पुणे बाजुकडून येणाऱ्या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग  

- पुणे - बंगलोर महामार्गावरून पवनानदी पूल, हॉटेल सॅन्टोसा पास करून किवळे पुलावरून वाहने डाव्या बाजुकडे वळवायची व २०० मिटरवरून द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूच्या सेवा रस्त्याने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जावे.
- निगडी, हँगिंग ब्रिजकडून येणाऱ्या प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्गे कृष्णा चौक येथून उजव्या बाजूस वळून परत द्रुतगतीमार्गापासून डाव्या बाजूस वळून सेवा रस्त्याने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जावे.
- गहुंजे पूल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येईल.


मामुर्डी गावातील रूहिडा बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

मरीमाता चौक किवळे नाला येथून मासुळकर फार्म बाजूकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. या मार्गावरील वाहने कृष्णा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

सामना संपल्यानंतर मुकाई चौक बसस्टॉप कडून किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद आहे. या मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

मामुर्डी ते कानेटकर बंगला तसेच मामुर्डी ते गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत प्रवेश बंद आहे.

कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे तसेच जुन्या पुणे - मुंबई महामार्गाच्या शेजारील मामुर्डी गावच्या बाजूस असलेल्या सेवा रस्त्याने गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड -अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारापर्यंत प्रवेश बंद आहे.

Web Title: Traffic changes for India vs England cricket match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.