मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…

By नितीश गोवंडे | Published: November 18, 2024 12:16 PM2024-11-18T12:16:37+5:302024-11-18T12:16:57+5:30

मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस    

Traffic changes for two days in Swargate area | मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…

मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…

पुणे : स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (दि. १९) आणि बुधवारी (दि. २०) बदल करण्यात येणार आहे. गणेश कला क्रीडा मंच परिसरातील मतदान केंद्रातून मतपेट्या, तसेच अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

पीएमपी बसमधून मतपेट्या आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसर ते नेहरु स्टेडियम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी आणि बुधवारी बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चैाकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मार्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देणात येणार आहे.

बुधवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री बारा यावेळेत सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मतदान साहित्य गणेश कला क्रीडा येथील मुख्य केंद्रात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनरायण चित्रपटगृह चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Web Title: Traffic changes for two days in Swargate area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.