Pune: मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौक व परिसरात वाहतूकबदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 11:37 AM2024-05-16T11:37:15+5:302024-05-16T11:38:13+5:30

या दरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे...

Traffic changes in Shimla Office Chowk and area due to metro work, know alternative routes | Pune: मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौक व परिसरात वाहतूकबदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

Pune: मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौक व परिसरात वाहतूकबदल, माहीत करून घ्या पर्यायी मार्ग

पुणे : सिमला ऑफिस चौकाजवळ मेट्रो स्टेशनसाठी गर्डर टाकण्याचे काम करायचे असल्याने शुक्रवार (ता. १७) पासून पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने काही बदल केले आहेत. शुक्रवारपासून पुढील आदेशापर्यंत हे बदल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी करण्यात आले आहेत. या दरम्यान वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी केले आहे.

असे आहेत बदल..

- वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी के. बी. जोशी मार्ग चौक ते सिमला ऑफिस चौक हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात येत आहे.

- वीर चाफेकर उड्डाणपुलावरून सिमला ऑफिस चौकाकडे प्रवेश बंद राहणार आहे. (पर्यायी मार्ग - चाफेकर उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूने सर्व्हिस रस्त्यावरून चाफेकर चौक - डावीकडे वळण घेऊन न. ता. वाडी - उजवीकडे वळण घेऊन सिमला ऑफिस चौक)

- फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून वीर चाफेकर चौकामधून सिमला ऑफिस चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

- न. ता. वाडी चौक ते चाफेकर चौक प्रवेश बंद राहील.

- स. गो. बर्वे चौकाकडून येऊन सिमला ऑफिस चौकातून शिवाजीनगर रेल्वे स्थानकाकडे प्रवेश बंद राहील.

- शिवाजीनगर रेल्वे स्टेशनकडून येऊन एसटी स्टँड सर्कलवरून न. ता. वाडीकडे जाण्यास प्रवेश बंद राहील.

- सिमला ऑफिस चौकाकडून पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या वाहनांनी एलआयसीकडील बाजूने जाऊन चाफेकर उड्डाणपुलावरून जावे.

- वीर चाफेकर चौक ते न. ता. वाडी चौक ते सिमला ऑफिस रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग करण्यात येत आहे.

Web Title: Traffic changes in Shimla Office Chowk and area due to metro work, know alternative routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.