मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

By नारायण बडगुजर | Published: January 22, 2024 10:11 PM2024-01-22T22:11:11+5:302024-01-22T22:11:36+5:30

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन

Traffic changes on Pune-Mumbai highway due to Maratha reservation march | मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईपर्यंत पदयात्रा काढली आहे. ही पदयात्रा बुधवारी (दि. २४) पिपरी -चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जाणार आहे. त्यासाठी वाहतुकीत बदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

पदयात्रा ही राजीव गांधी पूल (सांगवी), जगताप डेअरी चौक, डांगे चौक, बिर्ला रुग्णालय, चापेकर चौक (चिंचवडगाव), अहिंसा चौक - महावीर चौक (चिंचवड स्टेशन), खंडोबामाळ चौक (आकुर्डी), टिळक चौक (निगडी), भक्तीशक्‍ती चौक, देहूरोड, तळेगावमार्गे मुंबईकडे जाणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी सकाळी सहा वाजतापासून वाहतुकीत बदल केला आहे.  

सांगवी वाहतूक विभाग

- औंध डी मार्टकडून सर्व प्रकारच्या वाहनांना सांगवी फाट्याकडे प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने पोल चौकातून डावीकडे नागराज रस्तामार्गे जातील.
- पिंपळे निलखकडून येणारी वाहने रक्षक चौकाकडे न येता विशालनगर डीपी रस्त्याने जगताप चौक, कस्पटे चौकमार्गे जातील.
- जगताप डेअरी पुलाखालील चौकामध्ये कस्पटे चौकाकडून येणारी वाहने डाव्या व उजव्या बाजुने औंध - रावेत रस्त्याला न येता ती सरळ ग्रेड सेपरेटरमधून शिवार चौक - कोकणे चौकाकडून जातील.
- शिवार चौकाकडून येणारी वाहतूक उजव्या-डाव्या बाजुने औंध -रावेत रस्त्याला न येता ग्रेड सेपरेटरमधून कस्पटे चौकातून जातील.
- तापकीर चौक, एमएम चौकाकडून काळेवाडी फाटा पुलाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने रहाटणी फाटा चौकातून रहाटणीगाव गोडांबे चौकाकडून जातील.
- सांगवीगावातून सांगवी फाट्याकडे येणारी वाहने शितोळे पंप, जुनी सांगवी व वसंतदादा पुतळा चौक जुनी सांगवी दापोडीमार्गे जातील. 

वाकड वाहतूक विभाग

- ताथवडेगाव चौकाकडून डांगे चौकाकडे येणारी वाहने ताथवडे चौकातून उजवीकडे वळून ताथवडे अंडरपास किंवा परत संत तुकाराम महाराज पूलमार्गे जातील.
- काळाखडक येथून डांगे चौकाकडे जाणारी वाहने काळाखडक येथून यु टर्न घेऊन भुमकर चौकमार्गे जातील.
- वाकड दत्तमंदिर रस्त्याने डांगे चौकाकडे येणारी वाहने अण्णा भाऊ साठे चौकातून उजवीकडे किंवा डावीकडे वळून जातील.
- छत्रपती चौक, कस्पटे वस्ती येथून काळेवाडी फाट्याकडे येणारी वाहने छत्रपती चौक येथून डावीकडे वळून जातील.
- बारणे कॉर्नर थेरगाव येथून थेरगाव फाट्याकडे येणारी वाहने उजवीकडे वळून जातील किंवा यु टर्न घेऊन तापकीर चौकाकडे जातील.
- थेरगावकडून बिर्ला रुग्णालय चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असून ही वाहने राघवेंद्र महाराज मठ येथून जातील किंवा बारणे कॉर्नर थेरगावमार्गे जातील.
- कावेरीनगर पोलिस वसाहतीकडून येणाऱ्या वाहनांना कावेरीनगर अंडरपासकडे जाण्यास बंदी असून ही वाहने वाकड भाजीमंडई समोरील कॉर्नर येथून डावीकडे वाकड पाेलिस ठाण्याकडील रस्त्याने दत्त मंदिर रस्त्याने जातील.

चिंचवड वाहतूक विभाग

- दळवीनगर चौकाकडून खंडोबामाळ व चिंचवड स्टेशनकडे जाणारा रस्ता वाहनांसाठी बंद असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.  
- रिव्हर व्ह्यूव चौकातून डांगे चौक तसेच डौंगे चौकाकडून महावीर चौकाकडे येणार्‍या वाहनांस बंदी असून या मार्गावरील वाहने चिंचवडे फार्म मार्गाने वाल्हेकरवाडी रावेतमार्गे जातील. तसेच भोसरीकडे जाणारी वाहने बिजलीनगर वाल्हेकरवाडीमार्गे जातील. 
- चिंचवडेनगर टी जंक्शनकडे रिव्हर व्ह्यूवकडून जाणारी वाहने सरळ रावेतमार्गे जातील.  
- लोकमान्य हॉस्पिटल चौक, चिंचवड समोरील रस्त्यावरून महावीर चौक चिंचवडकडे जाणरा रस्ता वाहनांसाठी बंद असून या मार्गावरील वाहने लोकमान्य हॉस्पिटल चौकापासून डावीकडे वळून दळवीनगरमार्गे जातील.
- एसकेएफ चौक, चिंचवड मार्गाने खंडोबा माळ चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असून या मार्गावरील वाहने बिजलीनगर चौक मार्गाने जातील.
- लिंकरोड, पिंपरीकडून येणारी वाहने चापेकर चौकात न येता मोरया हॉस्पिटल चौक, केशवनगरमार्गे जातील.
- महावीर चौक व शिवाजी चौकात येणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने मोहनगर चौकमार्गे जातील.
- बिजलीनगर चौकाकडून त्रिवेणी हॉस्पिटल चौकाकडून रिव्हर व्ह्यूव चौकाकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहतूक रावेतमार्गे जाईल. 
- मुकाई चौकाकडून चिंचवडकडे येणारी वाहतूक त्रिवेणी हॉस्पिटल वाल्हेकरवाडी येथे डावीकडे वळून पुढे पार्श्वनाथ चौक, भेळ चौकमार्गे काचघर चौकातून डावीकडे वळून पुढे यु टर्न घेऊन भक्‍तीशक्‍ती चौकातील भुयारी मार्गातून अंकुश चौक, त्रिवेणीनगरमार्गे जातील.

पिंपरी वाहतूक विभाग

- निरामय हॉस्पिटलकडून महावीर चौकाकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता ती डाव्या बाजुकडे वळून मोरवाडी चौकमार्गे जाईल.
- परशुराम चौकाकडून खंडोबामाळ चौकाकडे जाण्यास वाहनांना बंदी असून ही वाहतूक आरडी आगा थरमॅक्‍स चौकमार्गे जाईल. 
- केएसबी चौकाकडून महावीर चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असून या मार्गावरील वाहने बसवेश्वर चौकातून डावीकडे वळून आटो क्लस्टरमार्गे जातील.

निगडी वाहतूक विभाग

- थरमॅक्‍स चौकाकडून येणारी वाहतूक आरडी आगा मार्गाकडून गरवारे कपंनी कंपाऊडपर्यंत येऊन तेथील टी जंक्शनवरून खंडोबामाळ चौकाकडे न जाता डावीकडून परशुराम चौकाकडून मोहननगर चिंचवडमार्गे जाईल.
- दळवीनगर पुलाकडून व आकुर्डी गावठाणातून येणारी वाहतूक खंडोबामाळ चौकाकडे न येता गणेश व्हिजनमार्गे व आकुर्डी गावठाणमार्गे जाईल.
- दुर्गा चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता थरमॅक्‍स चौकाकडे किंवा यमुनानगरमार्गे जाईल.
- भेळ चौकाकडून येणारी वाहतूक टिळक चौकाकडे न येता सावली हॉटेलमार्गे जाईल.
- अप्पुघर/रावेतकडून येणारी वाहतूक व ट्रान्सपोर्टनगरमधून येणारी वाहतूक भक्‍तीशक्‍ती पुलावर न चढता भक्‍तीशक्‍ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने (अंडरपासमधून) अंकुश चौक, त्रिवेणीनगरमार्गे जाईल.
- त्रिवेणीनगर, अंकुश चौकाकडून भक्तीशक्‍ती चौकाकडून देहुरोडकडे जाणारी वाहतूक भक्तीशक्‍ती सर्कलखालच्या भुयारी मार्गाने सरळ अप्पूघर रावेतमार्गे देहुरोड मुंबईकडे जाईल.
- देहूरोडकडून येणारी वाहतूक भक्‍तीशक्‍ती सर्कलवरून त्रिवेणीनगर चौकाकडे वळतील किंवा पुनागेट हॉटेलसमोरून भक्‍तीशक्‍ती उड्डाणपुलावरून सरळ ग्रेडसेपरेटरमधून जाईल,
- भक्‍तीशक्‍तीकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवून संत तुकाराम महाराज पूलमार्गे जाईल.

भाेसरी वाहतूक विभाग

- पुणे, खडकी, दापोडी, फुगेवाडी बाजूकडून भक्‍तीशक्‍ती चौकाकडे जाणारी वाहने भक्‍तीशक्‍ती चौकाकडे न जाता नाशिक फाट्यावरून मोशी चौक किंवा कस्पटे चौकमार्गे जातील.
- चाकण, मोशी, आळंदी बाजूकडून नाशिक फाटामार्गे मुंबई बाजूकडे जाणारी वाहने पांजरपोळ जंक्शनवरून स्पाईन रोडने त्रिवेणीनगर, भक्‍तीशक्‍ती अंडरपासमधून रावेतमार्गे जातील किंवा नाशिक फाटा, कस्पटे चौक, वाकड नाकामार्गे जातील.

देहूरोड वाहतूक विभाग

-  तळवडेकडून देहूकमान, जुना मुंबई-पुणे महामार्गाकडे येणारी वाहतूक पूर्ण बंद करून देहुगावमार्गे जाईल.
- मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरून येणारी वाहतूक सोमाटणे एक्झिट, देहुरोड एक्झिट पूर्णपणे बंद करून बेंगळूर महामार्गाने जाईल.
- बेंगळूर महामार्गाने मुंबईकडे जाणारी वाहतूक किवळे पुलाकडून जुन्या महामार्गाने येण्यास बंदी असून जड, अवजड व छोटी वाहने द्रुतगती मार्गाने जातील. तसेच दुचाकी वाहने किवळे पंक्चरमधून- कृष्णा चौक - लोढा स्किम-गहुंजेगावमार्गे जातील.
- मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून बेंगळूर महामार्गाने जाईल.
- पदयात्रा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. त्यामुळे पदयात्रा भक्‍तीशक्‍ती चौकात आल्यानंतर वडगाव चौकातून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. 

तळेगाव वाहतूक विभाग

- तळेगाव चाकण रस्ता ‘५४८ डी’वरील मुंबईच्या दिशेने जाणारी जड व अवजड वाहतुकीस प्रवेश बंदी करून या मार्गावरील वाहने महाळुंगे वाहतूक विभागातील एचपी चौकमार्गे जातील.
- तळेगाव गावठाणकडून लिंब फाट्याकडे येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता डाव्या बाजूने जाईल.
- बेलाडोरमार्गे एबीसी पेट्रोलपंप चौकात येणारी वाहतूक सरळ व उजवीकडे न जाता डाव्या बाजूने जाईल.

Web Title: Traffic changes on Pune-Mumbai highway due to Maratha reservation march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.