शहरात अवैध वाहतूक, पोलिसांनाही कोणी जुमेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:29 AM2018-10-03T00:29:05+5:302018-10-03T00:29:24+5:30

चिंचवड स्टेशन : पोलीस आयुक्तालय झाल्यानंतरही नाही परिणाम

Traffic in the city, no one arrested by police | शहरात अवैध वाहतूक, पोलिसांनाही कोणी जुमेना

शहरात अवैध वाहतूक, पोलिसांनाही कोणी जुमेना

Next

पिंपरी : चिंचवड स्टेशन येथील अवैध प्रवासी वाहतूक व्यवसाय पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर थांबेल, असे वाटत असतानाच आयुक्तालयाच्या समोर अगदी बिनबोभाटपणे अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याने या गुंड प्रवृत्तीच्या वाहनचालकांना पोलिसांचे अभय असल्याची चर्चा आहे. १५ आॅगस्ट रोजी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय सुरू झाल्यानंतर येथील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ठोस पावले उचलली, तसेच गहन बनलेल्या वाकड, हिंजवडीच्या वाहतूककोंडीचा प्रश्नही सोडविण्यात आला. त्यांना यश आले, तर वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी अवैध र्पाकिंग आणि कलम २७९ वर त्यांनी जोर धरत धडक कारवाई मोहीम राबवून बेशिस्त वाहनचालकांनावठणीवर आणले. वाहतूक समस्येसाठी प्रसिद्ध असलेल्या आयुक्तांनी चिंचवड येथील अवैध प्रवासी वाहतुकीकडेदेखील जरा वाकडी नजर करून पाहण्याची आता गरज आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय तात्पुरत्या स्वरूपात चिंचवड येथील आॅटो क्लस्टर इमारतीत सुरू असून, आयुक्तालय या स्टँडपासून हाकेच्या अंतरावर आहे, तर पिंपरी पोलीस ठाण्याच्या अगदीसमोर ही अवैध वाहतूक सुरू असताना पोलिसांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष कसे असू शकते? या स्टँडमुळे येथे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात अवैध वाहतूक करणारे वाहनचालक आडव्या-तिडव्या मोटारी लावून वाहतूककोंडीत भर घालतात.
शहराला औषधांचा पुरवठा करणारा प्रसिद्ध दवा बाजारदेखील येथेच आहे, तसेच नामवंत रुग्णालये येथे असून, या बेशिस्त मोटारींमुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिका व रुग्णांना आडकाठी येते. येथे पदपथदेखील उरले नसल्याने पादचाºयांना जीव मुठीत धरून नाईलाजाने मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला
आहे.

या स्टँडवर अनेकदा वर्चस्ववादातून भांडणे-हाणामारी व वाहनांची तोडफोड यांसारख्या असंख्य घटना नेहमी घडतात. येथील झटपट मिळणाºया पैशांमुळे भाईगिरी फोफावत चालली आहे. छेडछाडीच्या घटनादेखील येथे घडल्या आहेत. मनमानी पद्धतीने तिकीट आकारले जाते. या सर्व प्रकाराची आणि मोटारींच्या कागदपत्रांची तपासणी करण्याऐवजी येथील वाहतूक पोलीस मूग गिळून गप्प आहेत. तथाकथित एजंट कमिशनवर या मोटारी भरून देण्याचे काम करतात. मालधक्का रोड, दवाबाजार, रेल्वे स्टेशन रोड, जयश्री थिएटर, एस. टी. स्टँड या तीन वेगवेगळ्या स्टँडवर सुमारे सव्वाशे मोटारी येथे असतात.
 

Web Title: Traffic in the city, no one arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.