चाकण-आंबेठाण रस्त्याच्या बेशिस्त कामामुळे वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:10 AM2021-09-19T04:10:06+5:302021-09-19T04:10:06+5:30
आंबेठाण : चाकण ते आंबेठाण या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण केले आहे. मात्र, बिरदवडी येथील दोनशे मीटर अंतराचे नूतनीकरण ...
आंबेठाण : चाकण ते आंबेठाण या दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण केले आहे. मात्र, बिरदवडी येथील दोनशे मीटर अंतराचे नूतनीकरण करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. येथे वाहनांना पर्यायी मार्ग नसल्याने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. परंतु, वाहतूक नियमन करण्यात येत नसल्याने मागील तीन दिवसांपासून अभूतपूर्व अशी वाहतूककोंडी पाहायला मिळत आहे.
चाकण ते भांबोली फाटा या दरम्यानच्या जिल्हा मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. यातील सर्वच काम पूर्ण झाले असून, बिरदवडी येथील अंदाजे दोनशे मीटर अंतराचे काम अपूर्ण राहिले होते. तेथील नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. हे काम ठेकेदाराकडून अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यात या ठिकाणी वाहतूक नियमन केले नसल्याने मागील तीन दिवसांपासून अभूतपूर्व अशी वाहतूककोंडी होत आहे.
बिरदवडी येथील दवणेमळा आणि वाघजाईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यारील वाहतूकही या रस्त्यावर येऊन पुढे चाकणकडे जात आहे. येथील चौकात तिन्ही मार्गांवरील वाहने एकाचवेळी समोरासमोर येत असल्याने आणि मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक या मार्गावर वळवण्यात आली होती. त्यात आज शनिवार असल्याने चाकणला जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी जाणारी बैले, शेळ्या-मेंढ्यांच्या गाड्या या वाहतूककोंडीत अडकल्याने पशुपालकांचे नुकसान झाले.
१८ चाकण
चाकण-आंबेठाण रस्त्यावर वाहनांच्या लागलेल्या मोठ्या रांगा.
180921\20210918_103118.jpg
चाकण आंबेठाण रस्त्यावर वाहनांच्या लागलेल्या मोठ्या रांगा.