वाहतुकीची लक्ष्मण रेषा अाेलांडणाऱ्या 3 लाख वाहनचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 06:56 PM2018-09-09T18:56:36+5:302018-09-09T18:58:19+5:30

नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असून गेल्या अाठ महिन्यात झ्रेब्रा क्राॅसिंगवर वाहन थांबविलेल्या ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे.

traffic cop took action on traffic rule violators | वाहतुकीची लक्ष्मण रेषा अाेलांडणाऱ्या 3 लाख वाहनचालकांवर कारवाई

वाहतुकीची लक्ष्मण रेषा अाेलांडणाऱ्या 3 लाख वाहनचालकांवर कारवाई

Next

पुणे : पुणे शहर जसे स्मार्ट हाेत अाहे, त्याचप्रमाणे पुण्यातील वाहतूक पाेलिसही स्मार्ट हाेत अाहेत. नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पाेलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येते. गेल्या अाठ महिन्यात नियम माेडणाऱ्या 10 लाख 18 हजार 560 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात अाली अाहे. त्यातही झेब्रा क्राॅसिंगवर उभ्या राहणाऱ्या वाहनचालकांची संख्या सर्वाधिक असून गेल्या अाठ महिन्यात अशा  ३ लाख ३७ हजार ३८४ वाहनांवर कारवाई करण्यात अाली अाहे. त्यांच्याकडून 6 काेटी 74 लाख 76 हजार 800 इतका दंड वसूल करण्यात अाला अाहे. 

    वाहतूक शाखेकडून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत अाहे. चाैकात वाहतूक पाेलीस नाही हे पाहून अनेकजण नियम माेडत असतात. गेल्या अाठ महिन्यांपासून वाहतूक पाेलीस तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम माेडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत अाहेत. चाैकाचाैकात लावण्यात अालेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही कारवाई करण्यता येते. झेब्रा क्राॅसिंगवर उभ्या राहणाऱ्या वाहनांचा फाेटाे काढून नियम माेडणाऱ्यांना नियमभंग केल्याचा एसएमएस केला जाताे. त्यात त्यांनी कशाप्रकारे नियम माेडला याचा फाेटाेही देण्यात अालेला असताे. चाैकात पाेलीस नाही म्हणून नियम माेडणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. या पद्धतीच्या कारवाईमुळे नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर जरब बसण्यास मदत हाेत अाहे. 
    

१ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१८ दरम्यान केलेली कारवाई
गुन्ह्याचा प्रकार                 केसेस            दंड(रु)
सिग्नल जंपिंग                 ११०२४६        २२०४९२००
झेब्रा कॉसिंग                    ३३७३८४        ६७४७६८००
लायसन्स न बाळगणे       ९९१२८        १९८२५६०९
नो लायसन्स                    १९५२५        ९७६२५००
राँग साईड                         ४८६६१        ९७३२२००
हेल्मेटविना                      ३६९३०        १८४६५००
मोबाईलवर बोलणे           ३७५४३        ७५०८६००
नो एंट्री                            ३८९३०        ७७८६००
एकूण                            १०१८५६०    २२५४६२२५९

Web Title: traffic cop took action on traffic rule violators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.