फलकांमुळेच होतेय वाहतूककोंडी

By admin | Published: October 30, 2014 11:48 PM2014-10-30T23:48:13+5:302014-10-30T23:48:13+5:30

मगरपट्टा चौकाच्या पुढच्या बाजूस बीआरटी मार्ग शिल्लक नाही, तरीही जलद वाहतूक बसकरिता फलक लावलेला पाहायला मिळत आहे.

Traffic drivers due to the panels | फलकांमुळेच होतेय वाहतूककोंडी

फलकांमुळेच होतेय वाहतूककोंडी

Next

मेहकर (बुलडाणा) : एटीएममधून पैसे काढून देतो, असे सांगून एटीएम कार्ड लंपास करुन पैसे काढून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील दिनकर पाठक हे एटीएममधून पैसे काढण्यासाठी स्थानिक स्टेट बँक कृषी शाखेजवळील एटीएम मशिनवर गेले. तेथे त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या एका तरुणाने पैसे काढण्याचा प्रयत्न करुन बाजूला उभा राहिला. दिनकर पाठक हे एटीएम मशिनजवळ जाताच त्या अज्ञात युवकाने पाठक यांना सांगितले की, तुमचे कार्ड द्या, मी मशिनमध्ये टाकतो. दिनकर पाठक यांनी त्या अज्ञात युवकाकडे एटीएम कार्ड देताच त्या युवकाने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन दोन हजार रुपये पाठक यांना काढून दिले; मात्र यादरम्यान त्याने पाठक यांच्या एटीएमचा वैयक्तिक पासवर्ड बघितला; तसेच हातचलाखीने दिनकर पाठक यांचे एटीएम कार्ड स्वत:जवळ ठेवून त्यांना दुसरे कार्ड दिले. काही तासानंतर पाठक यांना सदर बाब लक्षात आली. तेव्हा त्यांनी स्टेट बँकेत जावून खाते तपासले असता खात्यातून पूर्ण पैसे काढून घेतल्याचे लक्षात आले. पाठक यांना देण्यात आलेले एटीएम कार्ड हे बी.एम.गवळी यांचे हो ते. याप्रकरणी पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.

Web Title: Traffic drivers due to the panels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.