वाहतूककोंडीमुळे डोकेदुखी

By admin | Published: December 7, 2014 12:39 AM2014-12-07T00:39:09+5:302014-12-07T00:39:09+5:30

रस्त्याची कामे संपता संपत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न हडपसर वासीयांची डोकेदुखी ठरत आहे.

Traffic headaches cause headache | वाहतूककोंडीमुळे डोकेदुखी

वाहतूककोंडीमुळे डोकेदुखी

Next
जयवंत गंधाले ल्ल हडपसर
रस्त्याची कामे संपता संपत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न हडपसर वासीयांची डोकेदुखी ठरत आहे. लोकप्रतिनिधी येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. लोकवस्ती वाढत गेली. मात्र, नियोजनबद्ध दळणवळणाच्या साधनांची उभारणी झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 
पंधरा वर्षापासून सोलापूर रस्त्याची वेगवेगळी कामे  सुरू आहेत. सुरुवातीला रस्त्याचे रुंदीकरण झाले. त्यानंतर सिमेंटीकरण होत आहे. तोर्पयत गाडीतळावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले. त्या कामासाठी अनेक अडचणी आल्या. राजकीय हस्तक्षेप झाला. त्यामुळे उड्डाणपुलाचे नकाशे बदलण्यात आले. नालबंद येथील उड्डाणपुलाचे काम काही दिवस रखडले. त्यातून कसातरी उड्डाणपूल उभा राहिला. या दरम्यान नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीने ग्रासले होते. ही कामे झाल्यावर सुटका होईल, असे वाटले होते. मात्र, पुन्हा बीआरटीचे काम सुरू झाल्याने नागरिकांना पुन्हा वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. बीआरटी नियोजनबद्धपणो राबविण्यात पालिकेला अपयश आल्याने वाहतुकीचा प्रश्न तसाच राहिला.  वानवडी ते गाडीतळ दरम्यान बीआरटी प्रकल्प राबविण्यात आला. परंतु, यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळीही गेले. बीआरटीला नागरिकांनी विरोधही केला. मगरपट्टा चौकातील उड्डाणपूल मंजूर झाला आणि बीआरटी पुन्हा उखडण्यात आली. या उड्डाणपुलामुळे हडपसरमध्ये केवळ 1 किलोमीटरचा बीआरटी मार्ग शिल्लक आहे. त्यामार्गातून बस जाण्यासाठी फलक लावण्यात आले. त्यातून खासगी वाहनेही जात असून, कोणाचेही याकडे लक्ष नाही. 
मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाचे काम संपते तोच सासवड रस्त्यावरील गाडीतळ ते सत्यपूरम दरम्यानच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले. मात्र, या वेळीही नागरिकांना वाहतूककोंडीस तोंड द्यावे लागले. त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. तोच गाडीतळावर सासवड रस्त्यास जोडणा:या पुलाचे काम सुरू झाले. पूर्वी ‘वाय’ आकाराचा पूल होणार होता. 
त्यातील सासवड रस्ता ते सोलापूर रस्त्याला जोडणा:या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सोलापूर रस्त्यावरून सासवड रस्त्याला जोडणा:या पुलाचे काम सध्या सुरू आहे. त्यामध्येही पोलीस स्टेशनचा अडथळा आहे. तो अडथळा दूर करण्यात वेळ जात आहे. त्यामुळे दररोज वाहतूककोंडी होत आहे. याच वेळी ससाणोनगर व महादेवनगरच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. 
घोरपडी, ससाणोनगर, मांजरी येथील रेल्वे लाइनवरील उड्डाणपुलाचा प्रश्न रखडलेला आहे. त्यामुळे रेल्वे गेटवर तासन्तास वाहतूककोंडी नित्याचीच असते. मगरपट्टा, अमोनरा, ड्रीमसिटी, आयडी इन्फोसिस असे मोठे प्रकल्प वाहतूक वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. विकास होत आहे; मात्र सोईसुविधा होत नाहीत. रस्त्याची कामे कधी संपणार, आणि वाहतुकीची समस्या कधी सुटणार, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सध्या सुरू असलेली कामे संपली, तरी पुन्हा ससाणोनगर येथील भुयारी मार्ग, मांजरी येथील उड्डाणपूल, महादेवनगर चौकातील उड्डाणपूल, सत्यपूरम ते वडकी दरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण, अशी कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे हडपसरवासीयांची वाहतूककोंडीतून कधी सुटका होणार, असा सवाल केला जात आहे.
(वार्ताहर)
 
4सोलापूर रस्त्यावर रविदर्शन ते कवडीपाट दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हे काम कूर्मगतीने सुरू असल्याने, वाहतूककोंडीला निमंत्रण मिळत आहे. 
4या रस्त्यावरील चौका-चौकांत मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होते. वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे परिसरामध्ये ध्वनिप्रदूषण तर होतेच; तसेच वाहतूककोंडीमुळे रोज या रस्त्यांवर वाहनचालकांच्या कटकटी पाहावयास मिळत आहे. 

 

Web Title: Traffic headaches cause headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.