पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहतूक सुधारणा ‘केंद्रस्थानी’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 11:00 PM2020-01-28T23:00:00+5:302020-01-28T23:00:01+5:30

मध्यवस्तीतील पेठांमध्ये सार्वजनिक वाहतूक करणारी सौरऊर्जेवर चालणारी छोटी वाहने आणण्यात येणार

Traffic Improvement 'at the Center' in Budget of pune corporation | पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहतूक सुधारणा ‘केंद्रस्थानी’

पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात वाहतूक सुधारणा ‘केंद्रस्थानी’

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईच्या धर्तीवर ‘फ्री वे’ : सौरऊर्जेवर चालणारी छोटी वाहने शहराच्या मध्यवर्तीभागाकरिता स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपाययोजना करण्यात येणार केंद्र व राज्य सरकारचे वाहतूकविषयक महत्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात सुरु येत्या 50 वर्षांचा विचार करुन मेट्रोचे मार्ग निश्चित करुन करावे त्याचे नियोजन करावे बीआरटी योजनेचा फेरआढावा घेऊन त्याचा अभ्यास केला जाणार

पुणे : शहराची वाहतूक समस्या गंभीर झाली असून 38.86 लाख वाहने शहरात आहेत. यामध्ये 28 लाख दुचाकी आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात 73.48 टक्के जनता खासगी वाहने वापरते. वाहतूक पोलीस आणि वाहतूक विषयक अभ्यास व काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासोबतच शहराच्या मध्यवस्तीतील पेठांमध्ये सार्वजनिक वाहतूक करणारी सौरऊर्जेवर चालणारी छोटी वाहने आणण्यात येणार असून मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही  ‘फ्री वे’ ची चाचपणी केली जाणार असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. 
शहरातील दुचाकीधारकांची संख्या सर्वाधिक आहे. बीआरटी मार्गामधून ही वाहने सोडल्यास वाहतूक कोंडी कमी होऊ शकते. यासोबतच उत्पन्न वाढीकरिता पीएमपी डेपोमधील भंगार वाहने शहराबाहेर हलविण्यात येणार असून या जागांचा व्यापारी तत्वावर वापर केला जाणार आहे. मध्यवस्तीत होणारे अपघात कमी करण्याकरिता मोठ्या बसेस न सोडता सौरऊर्जेवरील छोटी वाहने सोडता येतील. त्यासाठी सीएसआरसारखी मदत मिळू शकेल. 
=====
केंद्र व राज्य सरकारचे वाहतूकविषयक महत्वाकांक्षी प्रकल्प पुण्यात सुरु आहेत. सध्या मेट्रोचे काम सुरु आहे. केवळ आजची आवश्यकता न पाहता येत्या 50 वर्षांचा विचार करुन मेट्रोचे मार्ग निश्चित करुन त्याचे नियोजन करावे. रस्ते, उड्डाणपूलासारख्या नैमित्यिक गोष्टींसोबत मेट्रोसारखे प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून भविष्याचे नियोजन करावे. शहर वाढत जाणार असून भूसंपादनासाठी भविष्यात मोठी रक्कम द्यावी लागेल. आताच जर नियोजन करुन जागा संपादीत केल्या तर आजच्या भावाने त्या घेता येतील. प्रकल्पांमध्ये 80 टक्के खर्च हा भूसंपादनावर होत आहे. 
====
पुणे शहरात 100 किलोमीटरचे सायकल ट्रॅक निर्माण करण्यात आले आहेत. परंतू, त्यामध्ये सलगता नाही. तुकड्या तुकड्यांनी असलेल्या या ट्रॅकचा वापर फारसा होताना दिसत नाही. शहरात सलग 10 ते 12 किलोमीटरचे सायकल ट्रॅक विकसित केल्यास नागरिक त्याचा वापर करु शकतील. 
====
बीआरटी योजनेचा फेरआढावा घेऊन त्याचा अभ्यास केला जाणार आहे. अभ्यास न करता योजना राबविणे गैर असून वाहतुकीसंदर्भात अभ्यासपूर्ण बदल केले जातील 

Web Title: Traffic Improvement 'at the Center' in Budget of pune corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.