कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 02:05 PM2019-07-31T14:05:09+5:302019-07-31T14:05:58+5:30

सध्या कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीकोंडी नित्याची झालीच आहे.

Traffic jam on Karve road Due to the "Metro": Punekar is a huge disappointment | कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण

कर्वे रस्त्यावरील वाहतूककोंडी " मेट्रो" मुळे : पुुणेकर प्रचंड हैराण

Next
ठळक मुद्देमेट्रो आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक मात्र हतबल

पुणे : सध्या कर्वे रस्त्यावर मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीकोंडी नित्याची झालीच आहे. परंतु आता त्यात पावसामुळे या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, येथील ड्रेनेज लाईन, पावसाळी गटारे तुंबल्याने ओव्हरफ्लो प्रचंड पाणी रस्त्यावर येतेय, फुटपाथांची प्रचंड दुरवस्था झालीय आणि त्यात पडलेले प्रचंड खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. मेट्रो आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कर्वे रस्त्यांवरून प्रवास करणारे नागरिक मात्र हतबल झाले आहेत. 
उन्हाळ्यामध्ये शहरातील ड्रेनेजलाइन आणि पावसाळी गटारांची योग्य प्रकारे स्वच्छता न केल्याने सध्या शहरामध्ये पावसाच्या एक-दोन चांगल्या सरी येऊन गेल्या तरी रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप येते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला असून, कार्यालयीन वेळेबरोबरच दिवसभर काही रस्त्यांवर वाहतूककोंडी होत आहे. याशिवाय खडकवासला धरण पूर्ण भरल्याने धरणातून तब्बल १४ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग नदीत सोडण्यात आला आहे. यामुळे नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात 
आला. यामुळेदेखील कर्वे रस्ता, लॉ कॉलेज रोडवरील वाहतूककोंडीमध्ये प्रचंड भर पडली आहे. 
.....
४सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी आयुक्त सौरभ राव यांना लेखी पत्र देऊन लॉ कॉलेज रस्ता आणि नळस्टॉप चौक, कर्वे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. यामध्ये या दोन्ही रस्त्यांवर तुंबलेल्या ड्रेनेजलाइन, पावसाळी गटारे, पडलेले प्रचंड खड्डे आणि यामुळे झालेली वाहतूककोंडी यामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणेकर नागरिक प्रचंड हतबल झाले आहेत. 
४याबाबत ड्रेनेज विभाग, पथ विभाग यांच्या स्थानिक जेईसोबत समन्वय साधूनदेखील अधिकाºयांनी हा प्रश्न सोडविण्यास असमर्थता दर्शवली आहे. 
.
यामुळे या दोन्ही रस्त्यांवरील ड्रेनेजलाइन, पावसाळी गटारे आणि खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने खास टीम पाठवून काम करण्याची गरज असल्याची मागणीदेखील खर्डेकर यांनी केली आहे. याबाबत तातडीने लक्ष दिल्यास या रस्त्यावर जीव जाण्याची शक्यतादेखील खर्डेकर यांनी आपल्या निविदांमध्ये म्हटले आहे. 
.........

Web Title: Traffic jam on Karve road Due to the "Metro": Punekar is a huge disappointment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.