एक्सप्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, गोल्डन अवर्समुळे वाहतुकीचा वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2018 07:42 AM2018-04-14T07:42:50+5:302018-04-14T07:42:50+5:30
एक्सप्रेस वेवर गोल्डन हार्वस करिता थांबवलेली अवजड वाहने एकदम सोडण्यात आल्याने आज भल्या पहाटेच एक्सप्रेस वेचा वेग मंदावला आहे.
लोणावळा : एक्सप्रेस वेवर गोल्डन हार्वस करिता थांबवलेली अवजड वाहने एकदम सोडण्यात आल्याने आज भल्या पहाटेच एक्सप्रेस वेचा वेग मंदावला आहे. घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र सकाळी सात वाजता दुतर्फा पहायला मिळाले.
सुट्टीच्या दिवसात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता शनिवार व रविवार एक्सप्रेस वेवर सकाळच्या सुमारास (गोल्डन अवर्स) अवजड वाहनांना काही तासांकरिता प्रवास बंद केला जातो, ही वाहने नंतर एकदम सोडली जात असल्याने एक्सप्रेस वेचा वेग मात्र सुसाट होण्याऐवजी मंदावला जातो आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीकडे अभिवादनाकरिता आज जाणार असल्याने रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त राहणार आहे. त्यातच शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्याही अधिक राहणार आहे. शुक्रवारी रात्री रोखून धरलेली अवजड वाहने तसेच आज पहाटेची अवजड वाहने एकदम रस्त्यावर आल्याने पुण्याकडे येणार्या मार्गावर अमृतांजन पुल ते टाटा गेट दरम्यान व मुंबईकडे जाणार्या मार्गावर अमृतांजन पूल ते खंडाळा एक्झिट दरम्यान वाहनांच्या रांगा लागत कोंडी झाली आहे. ही कोंडी लवकरात लवकर न सुटल्यास काही वेळात सुरु होणार्या पर्यटक वाहनांची यामध्ये भर पडत कोंडी वाढण्याची शक्यता आहे.