पुणेकरांचं Traffic Jam; वाहनांचा ‘भार’ अन् कोंडीचा मार, वाहनसंख्या तब्बल ३६ लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:03 AM2023-07-27T11:03:41+5:302023-07-27T11:03:48+5:30

शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढणे आवश्यक

Traffic jam of Pune people; The 'load' of vehicles and the deadlock, the number of vehicles is almost 36 lakhs | पुणेकरांचं Traffic Jam; वाहनांचा ‘भार’ अन् कोंडीचा मार, वाहनसंख्या तब्बल ३६ लाखांवर

पुणेकरांचं Traffic Jam; वाहनांचा ‘भार’ अन् कोंडीचा मार, वाहनसंख्या तब्बल ३६ लाखांवर

googlenewsNext

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शहरातील खासगी वाहनांच्या संख्येत ८६ हजार २०५ ने वाढ झाली आहे. २००६ मध्ये नोंदणीकृत खासगी वाहनांची एकूण संख्या १३ लाख ५३ हजार ११३ होती. ही संख्या २०२३ च्या जूनअखेरपर्यंत ३५ लाख ९४ हजार १३२ इतकी आहे. यावरून १७ वर्षांत तब्बल २२ लाख ४१ हजार १९ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही माहिती महापालिकेच्या २०२२-२३ च्या ‘पर्यावरण सद्य:स्थिती’ अहवालात देण्यात आली आहे.

शहरात २०१९ नंतर नवीन वाहनाच्या नोंदणीत घट झाली आहे. शहरात दुचाकी वाहनांच्या खरेदीतही घट झाली आहे. २०२० मध्ये शहरात १ लाख ४९ हजार २३५ वाहनांची नोंद झाली होती. २०२१ मध्ये १ लाख ६९ हजार ५५२ इतक्या वाहंनाची नोंद झाली आहे. मात्र, २०२२ मध्ये खासगी वाहनांच्या संख्येत ८६ हजार २०५ ने वाढ झाली आहे. २०२२ मध्ये २ लाख ५५ हजार ७५७ वाहनांची नोंद झाली आहे.

पीएमपीच्या २ हजार ७९ बस

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पीएमपीच्या एकूण २ हजार ७९ बस रस्त्यावर धावत आहेत. त्यापैकी १ हजार ४२१ बस सीएनजीवर, तर ४५८ इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे.

शहरात ५१ लाख झाडे 

पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाने जीआयएसप्रणाली वापरून वृक्षगणना केली आहे. त्यानुसार शहरात ५१ लाख ३७ हजार ६३२ झाडे आहेत. शहरात २११ उद्याने आहेत. याचे क्षेत्रफळ ५१ लाख ३७ हजार ६३२ आहे. या अहवालात पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ४५ लाख दाखविली आहे. त्यामुळे पुणे शहरात लोकसंख्येपेक्षा झाडांची संख्या जास्त आहे.

३२७ पीएमपी आयुर्मान संपलेले

शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत होऊन त्याचा वापर वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात ऑगस्ट २०२२ मध्ये १५० बस दाखल झाल्या. त्यानंतर एकही बस वाढलेली नाही. या उलट ३२७ बस या ११ ते १२ वर्ष वापरात असून, त्यांचे आयुर्मान संपलेले आहे.

Web Title: Traffic jam of Pune people; The 'load' of vehicles and the deadlock, the number of vehicles is almost 36 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.