चाकण आंबेठाण रस्त्यावरील वाघजाईनगर चौकात प्रंचड वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:40+5:302021-07-28T04:12:40+5:30
चाकण ते भांबोली फाटा या दरम्यानच्या जिल्हा मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम सुरू ...
चाकण ते भांबोली फाटा या दरम्यानच्या जिल्हा मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. मागील दोन वर्षांपासून हे काम सुरू आहे. यातील सर्वच काम पूर्ण झाले असून काही ठिकाणी स्थानिक लोकांच्या अडचणीमुळे काम अपूर्ण राहिले होते.तेथील नूतनीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यासाठी एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती.परंतु या ठिकाणी वाहतूक नियमन केले नसल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
बिरदवडी येथील दवणेमळा आणि वाघजाईनगर कडे जाणाऱ्या रस्त्यारील वाहतूक ही या रस्त्यावर येऊन पुढे चाकणकडे जात आहे.येथील चौकात तिन्ही मार्गावरील वाहने एकाच वेळी समोरा समोर येत असल्याने आणि वाहनचालकांना अरेरावी आंबेठाण,दवणेमळा,वाघजाईनगर आणि चाकणच्या दिशेने वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या.यावेळी यशोधन मुळे, मंगेश मुळे, बापू पडवळ,कुणाल मुळे,सचिन मुळे, आदित्य मुळे,अलंकार केदारी,माऊली मुळे,कार्तिक मुळे आदी स्थानिक तरुणांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र काही वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडी चार पाच तास उलटूनही सुरळीत होऊ शकली नाही.शेवटी स्थानिक तरुणांनी कंट्रोल रूम आणि वाहतूक पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली.
270721\1822-img-20210727-wa0049.jpg
चाकण आंबेठाण रस्त्यावर वाहनांच्या रांगा