रागाच्या भरात महिलेने घेतला पोलिसांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 03:03 PM2018-06-27T15:03:36+5:302018-06-27T15:05:07+5:30
सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने मोपेडवरील महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेण्याची घटना पुण्यात घडली आहे.
पुणे : सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने मोपेडवरील महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेण्याची घटना पुण्यात घडली आहे. या प्रकारानंतर संबंधित महिलेने घटनास्थळावरून पळ काढला. शहरातील कॅम्प भागातल्या महावीर चौकात ही घटना घडली.
याबाबत महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यानुसार पोलिसांनी वानवडीत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. साबळे या . सोमवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या़. . यावेळी मोपेडवरील महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले़. त्यामुळे रागावलेल्या महिलेने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा प्रकार आणखी पुढे नेट त्या महिलेने साबळे यांना धक्काबुक्कीही केली़. ही घटना लक्षात येताच हा त्यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या. त्यांनीही संबंधित महिलेला थांबविण्याचा प्रयत्न केला़ . तेव्हा रागावलेल्य महिलेने त्यांचा चावा घेऊन आपली सुटका करुन घेतली़. लष्कर पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़.