वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:49 AM2017-07-27T06:49:51+5:302017-07-27T06:49:55+5:30
जर तुम्ही ट्रिपल सीट जात असाल, जर तुम्ही नो एंट्रीमधून जात असाल अगर रस्त्याच्या कडेला कुठेही मोटार उभी करीत असाल तर सावधान... कारण वाहतूक पोलिसांनी या तीनही नियमभंगाविरुद्ध विशेष मोहिम हाती घेतली
पुणे : जर तुम्ही ट्रिपल सीट जात असाल, जर तुम्ही नो एंट्रीमधून जात असाल अगर रस्त्याच्या कडेला कुठेही मोटार उभी करीत असाल तर सावधान... कारण वाहतूक पोलिसांनी या तीनही नियमभंगाविरुद्ध विशेष मोहिम हाती घेतली आहे.
आगामी काळात ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असून दंडात्मक कारवाईवर भर देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली. गेल्या आठवड्याभरात या तीनही कारवायांमध्ये ८ हजार १९४ वाहनचालकांवर कारवाई करीत जवळपास १४ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
विरुद्ध बाजुने येणाºया आणि ट्रीपल सीट दुचाकी चालकांमुळे अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात घडत असून यामुळे अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासोबतच रस्त्याच्या कडेला कुठेही मोटारी
उभ्या करण्याचेही प्रमाण वाढले असून त्यामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत चालली आहे. याचा गांभिर्याने विचार करुन वाहतूक पोलिसांनी १८ जुलैपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे.
विरुद्ध बाजुने येणाºया वाहनचालकांचे विशेषत: दुचाकी चालकांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. सरळ जात असलेल्या वाहनचालकांना अनेकदा विरुद्ध बाजुने आलेल्या वाहनचालकांमुळे अपघातांचा सामना करावा लागतो. सरळ जात असताना वेग अधिक असल्याने अनेकदा वाहनचालकांना सावरण्याची
संधी मिळत नाही. काही
दिवसांपूर्वीच नगर रस्त्यावर विरुद्ध बाजूने आलेल्या टँकरमुळे झालेल्या अपघातात सात तरुणांना प्राण गमवावे लागले होते.
तर दुचाकींवर ट्रिपल सीट बसून वेडीवाकडी वळणे घेत जाणारे दुचाकीचालक सर्रास दृष्टीस पडतात. या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून
होत आहे. मोठमोठ्याने दुचाकींचे
हॉर्न वाजवित जाणारे हे तरुण रस्त्यावरून जात असलेल्या वाहनचालकांनाच दांडगाई करतात. अनेकदा महिला, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक वाहनचालकांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो.
सर्वसामान्यांना या नियमभंग करणाºया वाहनचालकांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांच्यावर वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. ट्रिपल सीट जाणारे, विरुद्ध बाजुने येणारे आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभे करुन जाणा-या वाहनचालकांना दंडाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
गेल्या आठच दिवसांत
केलेल्या कारवायांमधून चौदा लाखांचा दंड वसूल करण्यात
आला असून येत्या काही दिवसांत
ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
225 तळीरामांवर गटारीदिवशी कारवाई
आषाढातील आमावस्येच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाºया मद्यपार्ट्या लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी तळीरामांवर कारवाईची पूर्वतयारी केली होती. आमावस्येच्या दिवशी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील तब्बल २२५ तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. या सर्वांवर खटले भरण्यात आले असून न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आले होते. न्यायालयामध्ये दंड भरून त्यांची सुटका करण्यात आली.
वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. अन्य वाहनचालकांना आपल्यामुळे त्रास होऊ नये, तसेच अपघात घडू नयेत याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. ट्रिपल सीट जाणारे, विरुद्ध बाजुने येणारे आणि रस्त्याच्या बाजुला बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाºयांविरुद्ध विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.
- अशोक मोराळे, उपायुक्त, पुणे शहर वाहतूक शाखा