वाहतूक पोलीस कर्मचा-याला केली धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 08:19 PM2019-08-02T20:19:05+5:302019-08-02T20:20:23+5:30
उंडी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणा-या वाहतूक पोलीस कर्मचा-याला एकाने धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संजय करे यांनी फिर्याद दिली आहे.
पुणे : उंडी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करणा-या वाहतूक पोलीस कर्मचा-याला एकाने धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी कोंढवा वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संजय करे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडु विश्वंभर नांदे (वय 48, रा.वडाची वाडी) याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचारच्या सुमारास उंडी चौकात घडली. फिर्यादी करे हे उंडी चौकात वाहतूक नियंत्रणाचे काम करीत होते. आरोपी नांदे याने आपला टँंकर रस्त्यामध्ये वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पध्दतीने उभा केला. याबाबत करे यांनी त्यास विचारणा केली असता त्याने करे यांना अपशब्द वापरुन त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच धक्काबुक्की करुन सरकारी कामात व्यत्यय आणला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.एस.पाडवी करत आहेत.