लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांनी केला १ कोटीचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 09:10 PM2020-05-23T21:10:01+5:302020-05-23T21:14:14+5:30

गेल्या महिन्याभरात वाहतूक पोलिसांनी कंटेन्मेंटझोनच्या बाहेर तब्बल ६२ हजार २८२ वाहने तपासली...

Traffic police recovered a fine of Rs 1 crore during the lockdown | लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांनी केला १ कोटीचा दंड वसूल

लॉकडाऊनच्या काळात वाहतूक पोलिसांनी केला १ कोटीचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देपूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्याकडून जुना दंड वसुल करण्यास सुरुवातशहरातील कंटेन्मेंट भाग वगळता इतर भागातील सिग्नलही आजपासून सुरु

पुणे : कंटेन्मेंट झोनवगळता शहरातील अन्य भागातील बंधने गेल्या १५ दिवसांपासून शिथिल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अनेक उद्योग, व्यवसाय सुरु झाल्याने रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. त्यामुळे शहरातील कंटेन्मेंट भाग वगळता इतर भागातील सिग्नलही आजपासून सुरु करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांनी १९ एप्रिलपासून आजपर्यंत तब्बल १ कोटी रुपयांचा प्रलंबित दंड वसुल केला आहे.

लोक वाहने रस्त्यावर आणत असल्याने वाहतूक शाखेने त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी १९ एप्रिलपासून वाहनांची तपासणी सुरु केली. त्यांनी पूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यांच्याकडून जुना दंड वसुल करण्यास सुरुवात केली. गेल्या महिन्याभरात वाहतूक पोलिसांनी कंटेन्मेंटझोनच्या बाहेर तब्बल ६२ हजार २८२ वाहने तपासली. त्यातील २१ हजार ५२० वाहनांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आढळून आले होते.त्यांच्याकडून शुक्रवारपर्यंत ९९ लाख १५ हजार ३३६ रुपये दंड वसुल करण्यात आला होता.
शनिवारी दुपारपर्यंत २४५ केसेस केल्या असून त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ३०० रुपये दंड वसुल केला आहे.

त्यानुसार आतापर्यंत १ कोटी ४१ हजार ६३६ रुपये दंड वसुल केला आहे. वाहनचालकांची तपासणी करताना वाहतूक पोलिसांनी 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे बंधन पाळावे. तसेच हातात हँडग्लोज घालावे, अशी सूचना पोलिसांना करण्यात आली आहे.
.....................................

* १९ एप्रिलपासून दंडवसुली सुरु
* आतापर्यंत २१, ७६५ वाहनचालकांवर कारवाई
* शनिवारी दुपारपर्यंत १,००,४१,६३६ दंड वसुली

.................
शहरातील काही सिग्नल बंद
शहरात जवळपास ३६१ सिग्नल आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर संचारबंदी करण्यात आल्याने हे सर्व सिग्नल बंद होते. आज हे सिग्नल सुरु करण्यातआले. जवळपास दोन महिने सिग्नल बंद असल्याने काही सिग्नलमध्ये तांत्रिकबिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.

Web Title: Traffic police recovered a fine of Rs 1 crore during the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.