वाहतूक पोलिसाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 12:51 AM2017-08-17T00:51:10+5:302017-08-17T00:51:12+5:30
न्यायाधीशाच्या पतीनेच वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर परिसरात उघडकीस आला आहे.
पुणे : न्यायाधीशाच्या पतीनेच वाहतूक पोलिसाला मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर परिसरात उघडकीस आला आहे. सीसीटीव्ही कँमेºयामध्ये रेकॉर्डिंग झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली. मात्र मारहाण करणा-यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.
कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात दुपारी 12 वाजता श्याम भदाणे तरुणीसह सिग्नल तोडून पळ काढत होते. यावेळी रवींद्र इंगळे आणि कैलास काळे हे दोघे कर्मचारी वाहतुकीचे नियंत्रण करीत होते. सिग्नल तोडणा-या त्यांच्या गाडीला दोघांनी अडवले.
त्यावरून भदाणे आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर भदाणे याने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा
प्रयत्न केला. पोलिसांच्या अंगावर हात उचलण्यापर्यंत दोघांची
मजल गेली. मारहाण करणाºयांमध्ये एक मुलगी देखील होती.
तिथून जवळच असलेल्या सीसी टीव्ही कॅमेºयामध्ये या घटनेचं रेकॉर्डिंग झाले आहे. भदाणे यांची
पत्नी न्यायाधीश असल्यानेच त्यांना स्पेशल ट्रीटमेंट असल्याचा आरोप केला जात आहे.
>मी सिग्नल तोडला नाही, पावती फाडणार नाही. असे सांगून त्याने माझ्या पायावर गाडी घातली. मी पाय काढून घेण्यासाठी त्यांना ढकलून दिले. त्यांनी मला मारहाण करायला सुरूवात केली. माझी पत्नी न्यायाधीश आहे, मी न्यायालयातून लायसन्स सोडवून घेईन काय करायचे ते करा. त्यांच्या लायसन्सची मुदतही संपलेली होती. सिग्नल तोडला म्हणून पावतीचे चलन देत होतो, मात्र त्यांचा अहंकार दुखावला आणि मुलीसमवेत दोघांनी मला मारायला सुरूवात केली.
- रविंद्र इंगळे, वाहतूक पोलीस