चतुर्थीला दगडुशेठ जवळ वसुलीचा प्रयत्न करणारा वाहतूक पोलीस निलंबित

By विवेक भुसे | Published: March 14, 2023 07:47 PM2023-03-14T19:47:27+5:302023-03-14T19:47:40+5:30

संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवरील दगडूशेठ मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती

Traffic police suspended for trying to recover near Dagdusheth on Chaturthi | चतुर्थीला दगडुशेठ जवळ वसुलीचा प्रयत्न करणारा वाहतूक पोलीस निलंबित

चतुर्थीला दगडुशेठ जवळ वसुलीचा प्रयत्न करणारा वाहतूक पोलीस निलंबित

googlenewsNext

पुणे : गणेश चतुर्थीला शिवाजी रोडवर श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. अशा वेळी वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहनचालकांना थांबवून त्यांच्याकडून वसुलीचा प्रयत्न करणाऱ्या वाहतूक शाखेच्या कर्मचार्याला निलंबित करण्यात आले. पोलीस नाईक अनिल कल्लाप्पा जामगे असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अनिल जामगे हे फरासखाना वाहतूक शाखेत कार्यरत होते. ११ मार्च रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी जामगे यांची शिवाजी रोडवरील बुधवार चौकात नेमणूक होती. दोघे जण दुचाकीवर सायंकाळी ७ वाजता बुधवार चौकातील सिग्नलला थांबले होते. त्यावेळी त्यांच्याकडील अन्य जिल्ह्यातील दुचाकी पाहून जामगे यांनी त्यांना अडविले. लायसन्सची मागणी विचारणा केली. त्यांच्याकडे लायसन्स नसल्याने विना लायसन्स वाहन चालविण्याकरीता ५ हजार रुपये दंड असल्याचे सांगितले. गाडीचे मालक दुसरे असल्याने चालक व मालक असे १० हजार रुपये दंड भरण्यास सांगितले. तक्रारदार यांना ५०० रुपये रोख आणण्यास सांगितले. तक्रारदार हे एटीएममध्ये पैसे आणण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे एटीएम नसल्याने ते परत आले. त्यानंतर जामगे याने तक्रारदार यांची गाडी वाहतूक विभागात आणली. स्वत:ची नेमप्लेट पाडून आपली ओळख लपविली. यापूर्वी वरिष्ठांना व पोलीस अंमलदारांना कारवाई दरम्यान बॉडी कॅमेरे वापरण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते. परंतु त्याने बॉडी कॅमेरा बाळगला नाही व दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. संकष्टी चतुर्थी असल्याने शिवाजी रोडवर मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होती व त्यामुळे दगडुशेठ मंदिर व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असे. अशा वेळी तक्रारदार यांची गाडी अडवून त्यांच्याशी चर्चा करण्यामध्ये विनाकारण वेळ वाया घालविला व नेमून दिलेल्या वाहतूक नियमानाचे कर्तव्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे बेशिस्त बेजबाबदार वर्तन केल्याने अनिल जामगे यांना वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी निलंबित केले आहे.

Web Title: Traffic police suspended for trying to recover near Dagdusheth on Chaturthi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.