सिग्नल का तोडला म्हणून विचारणा केल्याने वाहतूक पाेलिसालाच बुटाने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:45 AM2022-09-26T10:45:20+5:302022-09-26T10:51:01+5:30

वाहतूक पोलीस अंमलदारालाच एका माेटारचालकाने बुटाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार....

traffic police was beaten with a shoe in pune for Ask why the signal broke pune crime news | सिग्नल का तोडला म्हणून विचारणा केल्याने वाहतूक पाेलिसालाच बुटाने मारहाण

सिग्नल का तोडला म्हणून विचारणा केल्याने वाहतूक पाेलिसालाच बुटाने मारहाण

googlenewsNext

पुणे : सिग्नल का तोडला, अशी विचारणा करणाऱ्या वाहतूक पोलीस अंमलदारालाच एका माेटारचालकाने बुटाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ वाहतूक विभागातील पोलीस अंमलदाराने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी बाळकृष्ण जयराम टाळके (वय ३२, रा. निओ सिटी सोसायटी, वाघोली) याला अटक केली आहे. हा प्रकार पुणे-नगर रोडवरील खराडी बायपास चौकात शनिवारी सायंकाळी घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी हे खराडी बायपास चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी चंदननगरकडून हडपसरच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी लाल सिग्नल झाल्याने फिर्यादी यांनी या रोडने जाणाऱ्या वाहनांना थांबण्याचा इशारा केला. तरीही बाळकृष्ण टाळके हा सिग्नल तोडून काही अंतर पुढे आला.

तेव्हा फिर्यादी त्याची गाडी थांबवून बाजूला घेऊन आपण सिग्नल का तोडला, असे विचारले. त्याचा राग आल्याने फिर्यादी यांच्या सरकारी वर्दीची कॉलर पकडून शर्टचे बटण तोडले. त्यांना शिवीगाळ करून तुम्हा पोलिसांना खूप मस्ती आली आहे, असे म्हणत त्याने त्याच्या पायातील बूट हातात घेऊन फिर्यादी यांच्या डोक्यात मारहाण केली. सरकारी कामात अडथळा आणल्यावरून गुन्हा दाखल करून कारचालकाला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक लहाने तपास करीत आहेत.

Web Title: traffic police was beaten with a shoe in pune for Ask why the signal broke pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.