कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:34 IST2025-01-30T13:34:09+5:302025-01-30T13:34:53+5:30

वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोइंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलताना कारवाईस विरोध करून पोलिसांशी वाद घालण्यास सुुरुवात केली

Traffic policeman who took action was beaten with slippers by 2 women | कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण

कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसाला २ महिलांकडून चपलेने मारहाण

पुणे : फूटपाथवर लावलेल्या दुचाकीवर कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्याला दोन महिलांनी धक्काबुक्की केल्याची घटना हडपसर भागात घडली. वाहतूक पोलिसाला चपलेने मारहाण केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधातहडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी बालिका सूर्यवंशी आणि संगीत लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कर्मचारी आजिनाथ आघाव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी आघाव हडपसर वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी महिलांनी हडपसर परिसरातील गाडीतळ भागात बेशिस्तपणे दुचाकी लावली होती. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास फूटपाथवर लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत होती. वाहने उचलणाऱ्या गाडीतील कर्मचारी (टोइंग व्हॅन) आरोपी महिलांची दुचाकी उचलत होते. त्यावेळी आरोपींनी कारवाईस विरोध करून आघाव यांच्याशी वाद घालण्यास सुुरुवात केली.

आरोपींनी आघाव यांना चपलेने मारहाण करून धक्काबुक्की केली. त्यांनी आघाव यांना धमकावले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक अल्ताफ शेख पुढील तपास करत आहेत.

Web Title: Traffic policeman who took action was beaten with slippers by 2 women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.