शिक्रापुरकडे जाणाऱ्या तीन मार्गावरील वाहतुक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:15 AM2020-12-30T04:15:21+5:302020-12-30T04:15:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेलपिंपळगाव : पेरणे येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्र हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारी तीन मार्गावरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेलपिंपळगाव : पेरणे येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्र हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारी तीन मार्गावरील वाहतुक १ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून पर्यायी मार्गाने वळवून संबंधित रस्त्यांवर प्रवेश बंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.
राज्यासह परराज्यातून १ जानेवारीला जयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीक येत असतात. महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांच्याकडील परिपत्रकान्वये सदर अभिवादनाचा कार्यक्रम कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात व साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शन सूचना देण्यात आलेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमारीता पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्राचे हद्दीतुन शिक्रापुरकडे जाणारे तीन मार्गावरील वाहतूक १ जानेवारी रोजी मध्यरात्री एक वाजल्यापासून ते रात्री बारावाजेपर्यंत खाजगी व सार्वजनिक वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यास पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांनी विनंती केले होती. त्यानुसार चाकण-शेलपिंपळगाव - बहुळ - साबळेवाडी - चौफुला अशी दोन्ही बाजुकडील जाणारी - येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
आळंदी - शेलपिंपळगाव - बहुळ - साबळेवाडी तसेच आळंदी - मरकळ - कोयाळी - शेलपिंपळगाव - बहुळ - साबळेवाडी -चौफुला येथील दोन्ही बाजुकडील जाणारी - येणारी सर्व प्रकारची वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.