चार मिनिटासाठी वाहतूकीचे नियम धाब्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 08:41 PM2018-09-04T20:41:19+5:302018-09-04T20:49:00+5:30
वाहतूक शाखेने केलेल्या चाचणीत नियम ताेडून वाहन चालविले तरी ठराविक अंतर पार करण्यास लागणाऱ्या वेळेत फारसा वेळ लागत नसल्याचे समाेर अाले अाहे.
पुणे : पुण्याच्या लाेकसंख्येपेक्षा वाहनांची संख्या अधिक असल्याने राेजच नागरिकांना वाहतूक काेंडीत अडकून पडावे लागते. हिंजवडी, वाघाेली येथे सतत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीला तर नागरिक पुरते वैतागले अाहेत. वाहनांची संख्या अधिक असणे हे जरी वाहतूक काेंडीचे एक कारण असले तरी बेशिस्त वाहनचालक हे वाहतूक काेंडीचे प्रमुख कारण अाहे. पुणे वाहतूक पाेलीसांनी केलेल्या एका चाचणीतून वाहतूकीचे नियम ताेडून वाहन चालविल्यास तसेच वाहतूकीचे सर्व नियम पाळून वाहन चालविल्यास फारसा फरक पडत नसल्याचे समाेर अाले अाहे. पाेलिसांनी केलेल्या चाचणीत नियम पाळणाऱ्या वाहनचालकाला नियम माेडणाऱ्या वाहनचालकापेक्षा अवघे 4 मिनिटं जास्त एक ठराविक अंतर पार करण्यास लागल्याचे समाेर अाले अाहे.
वाहतूक शाखेचे चार कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही चाचणी करण्यात अाली. कात्रज चाैक भाजी मंडई ते शिवाजीनगर येथील सिमला अाॅफिस चाैकापर्यंतचे अंतर पार करण्यात अाले. साध्या वेशातील कर्मचारी सकाळी 10.30 वाजता कात्रज येथून निघाले. यातील एका दुचाकीवरील कर्मचाऱ्याने सर्व नियमांचे पालन केले त्यात हार्न न वाजविणे या नियमाचाही समावेश करण्यात अाला हाेता. तर दुसऱ्या दुचाकीवरील कर्मचाऱ्याने वाहतूकीचे काेणतेही नियम पाळले नाहीत. यात नियम न पाळणाऱ्या कर्मचाऱ्याला हे अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटे लागले तर सर्व नियम पाळणाऱ्या कर्मचाऱ्याला 28 मिनिटे लागले. दाेन्ही वाहनचालकांमध्ये केवळ 4 मिनिटांचा फरक हाेता. त्यामुळे नियम ताेडून कशाही पद्धतीने वाहन चालवून केवळ चार ते पाचच मिनिटांचा जास्तीचा वेळ लागताे, परंतु या चार मिनिटांसाठी अनेक वाहनचालक स्वतःबराेबरच इतरांचाही जीव धाेक्यात घालत असतात. या उलट नियम पाळल्यास सुरक्षित व वेळेत निश्चित स्थळी पाेहचण्यास नागरिकांना शक्य हाेणार अाहे.
त्यामुळे सर्व वाहनचालकांना वाहतूकीचे सर्व नियम पाळण्याचे अावाहन वाहतूक शाखेकडून करण्यात अाले अाहे. ही चाचणी पुण्याचे पाेलिस अायुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अाली. या चाचणीवेळी वाहतूक उपायुक्त तेजस्वी सातपुते, दत्तवाडी वाहतूक विभागाचे पाेलिस निरिक्षक कमलाकर ताकवले, संपतराव भाेसले, ढगे अादी उपस्थित हाेते. तर या चाचणीत दत्तवाडी वाहतूक विभागातील पाेलिस नाईक बाठे, पाेलिस शिपाई शिंदे व सहकारनगर वाहतूक विभागातील पाेलिस नाईक गिरमे अाणि चाैधरी सहभागी झाले हाेते.