शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:00+5:302021-07-24T04:08:00+5:30

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच तीन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या ...

Traffic was disrupted as trees fell at three places in the city | शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

Next

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याबरोबरच तीन ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यावर झाडे आणि फांद्या पडल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली.

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शुक्रवारी दुपारी कर्वेनगर भागातील नवसह््याद्री परिसर, विठ्ठल मंदिर तसेच एरंडवणे भागातील पटवर्धन बाग भागात झाडे कोसळली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केली. शहरात दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पावसामुळे वस्ती भागात पाणी शिरण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र, जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. खडड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे जीव मुठीत धरून पुणेकरांना वाहन चालविण्याची वेळ येत आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून नदीपात्र परिसरात अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. तसेच डेक्कन जिमखाना परिसरातील भिडे पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असल्याचे डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले. डेक्कन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांकडून या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

----------------

Web Title: Traffic was disrupted as trees fell at three places in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.