एफडीए कार्यालसमोरच तस्करी

By admin | Published: December 2, 2014 11:46 PM2014-12-02T23:46:44+5:302014-12-02T23:46:44+5:30

अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे कार्यालयासमोरील इमारतीतून एक तस्कर पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२) उघडकीस

Trafficking in front of FDA office | एफडीए कार्यालसमोरच तस्करी

एफडीए कार्यालसमोरच तस्करी

Next

पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे कार्यालयासमोरील इमारतीतून एक तस्कर पानमसाला व सुगंधित तंबाखूची विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.२) उघडकीस आला. या तस्कराकडून तब्बल दोन लाख ५३ हजार ५६६ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
विनोदकुमार शिवनारायण प्रजापती (रा. मन्साराम नाईक इमारत, गुरुवारपेठ) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अस्मिता टोणपे, शीतल घाटोळ व राजेंद्र काकडे व पटवर्धन यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास शुक्रवार पेठेतील दिलीप ट्रेडर्स या दुकानातून ९१ हजार ८२० रुपयांचा गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. रोहित रजनीकांत सुरतवाला यांच्या दुकानावर ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी धनश्री निकम, योगेश ढाणे, अस्मिता गायकवाड यांनी ही कारवाई केली. गुटखाबंदी जाहीर झाल्यापासून पुणे विभागातून गेल्या सव्वादोन वर्षांत तब्बल ४ कोटी ३३ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती एफडीएचे सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Trafficking in front of FDA office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.