पुणे-जसीडीह दरम्यान रेल्वे धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:13 AM2021-09-26T04:13:05+5:302021-09-26T04:13:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रेल्वे प्रशासन पहिल्यांदाच पुणे ते जसीडीह दरम्यान विशेष रेल्वे सुरू करीत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेल्वे प्रशासन पहिल्यांदाच पुणे ते जसीडीह दरम्यान विशेष रेल्वे सुरू करीत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याहस्ते २७ सप्टेंबरला या सेवेचे उद्घाटन होणार आहे.
गाडी क्रमांक ०१४२८ जसीडीह -पुणे एक्स्प्रेस २७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी जसीडीह येथून निघेल. एक ऑक्टोबरपासून ही सेवा नियमित केली जाईल.
गाडी क्रमांक ०१४२७ एक ऑक्टोबरपासून दर शुक्रवारी पुण्याहून सकाळी ०६.३५ मिनिटांनी सुटेल. जसीडीह येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४२७ तीन ऑक्टोबरपासून दर रविवारी ८ वाजून २० वाजता जसीडीह येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ०९.४० मिनिटांनी पुण्याला पोहोचेल. या गाडीला दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जं., सासाराम, गया, किऊल, झाझा आदी स्थानकांवर थांबा देण्यात आला.