पीएमपी कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 08:38 PM2018-04-18T20:38:19+5:302018-04-18T20:38:19+5:30

पीएमपीच्या बसेसला एकीकडे सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. संबंधित बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

Training to fire control for PMP employees | पीएमपी कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण

पीएमपी कर्मचाऱ्यांना आग विझविण्याचे प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देअग्निशमन यंत्र पुरविणाऱ्या खासगी संस्थेकडून हे प्रशिक्षण सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग

पुणे : बसेसला आग लागण्याच्या घटनांनंतर जागे झालेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाने आता चालक, वाहकांसह सर्व कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सलग अकरा दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पीएमपीच्या बसेसला सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत आहेत. देखभाल दुरूस्तीचा अभाव तसेच काही तांत्रिक कारणांमुळे या आगी लागत आहेत. एकीकडे आग लागत असताना संबंधित बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर बहुतेक मुख्य बसस्थानके बसस्थानके, इमारतींमध्ये अग्निशमन यंत्र अस्तित्वात नसल्याचे उघडकीस आले. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने बसेससह इमारतींमध्ये ही यंत्र बसविण्याचे काम हाती घेतले आहे. हजारांहून अधिक बसेसमध्ये ही यंत्र बसविण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
ही मोहीम दि. १७ एप्रिल रोजी हडपसर आगारापासून सुरू करण्यात आली असून दि. २७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. दररोज एका आगारांमध्ये दुपारी १ ते ३ असे दोन तास हे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये वाहक, चालकांसह आगारातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. मुख्य कार्यशाळा, भांडार विभाग, इलेक्ट्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आगप्रतिबंधक यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण मोजक्याच कर्मचाऱ्यांना दिले जात होते. त्यातही सातत्य नव्हते. मागील काही दिवसांत बसेसला आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर आता सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्यांदाच अशा पध्दतीने सर्व कर्मचारी प्रशिक्षित केले जाणार आहे. प्रामुख्याने चालक व वाहकांसाठी हे प्रशिक्षण महत्वाचे असेल. अग्निशमन यंत्र पुरविणाऱ्या खासगी संस्थेकडून हे प्रशिक्षण दिले जात आहे.
-------

Web Title: Training to fire control for PMP employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.