स्वयंसेवकांना बॉँबशोधक पथकाकडून प्रशिक्षण : पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 10:12 PM2019-09-07T22:12:00+5:302019-09-07T22:13:31+5:30
समाजकंटकांनी अशांतता निर्माण करु नये, यासाठी सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पोलीस करतात.
पुणे : गणेशोत्सव जनतेचा उत्सव आहे़ त्यामुळे केवळ पोलिसांवर अवलंबून राहता येणार नाही़ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गणेश मंडळांचे कार्यकर्ते, सर्वसामान्यांचे सहकार्य, मार्गदर्शन आवश्यक आहे़ लोकांनी एकमेकांना ओळखले पाहिजे़ शहरातील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमधून काही जणांना स्वयंसेवक म्हणून सुरक्षेबाबत काय काळजी घ्यावी, याचे प्रशिक्षण बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून देण्यात येत आहे़ त्यांना मंडळाचा मंडप व परिसराची सुरक्षेच्या दृष्टीने कशी काळजी घेतली पाहिजे, याचे मार्गदर्शन व्हिडिओ व अन्य साहित्यांद्वारे दिले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी संवाद साधताना पोलीस आयुक्त म्हणाले, गणेशोत्सव जनतेमध्ये उत्साह आणि चैतन्य निर्माण करतो़. उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करता यावा, यासाठी पोलीस आपले काम करीत आहेत़ हा उत्सव निर्विघ्न पार पाडावा, यासाठी पोलीस काही गोष्टींवर नियंत्रण आणत असतात़. त्याला जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. गणेशोत्सवात मंडळांचे देखावे, आरास पाहण्यासाठी दूरदूरहून भाविक येत असतात़ या गर्दीवर नियंत्रण आणणे, समाजकंटकांनी अशांतता निर्माण करु नये, यासाठी सुरक्षेची काळजी घेण्याचे काम पोलीस करतात. भाविकांना देखावे पाहण्यास त्रास होऊ नये, यासाठी अनेक रस्त्यांवर वाहतूक शाखेकडून निर्बंध आणले जातात़. त्यांना नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असते़ त्यामुळे ज्या रस्त्यावर निर्बंध घातले आहेत़ त्याचे पालन केले पाहिजे़.
गणेशोत्सवात अनेक लोक आजारी, ज्येष्ठ नागरिकही असतात़ त्यांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास होत असतो़. त्यांची काळजी घेणो सर्वांचेच काम आहे़. उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणाबाबत जे निर्बंध घालून दिले आहेत, त्याचे मंडळांनी जागरुकतेने पालन करण्याची आवश्यकता आहे़.
पोलिसांच्या विनंतीला मान देऊन अनेक मंडळांनी सीसीटीव्ही लावले आहेत़. त्याद्वारे देखरेख करण्यात येत आहे़ विसर्जन मिरवणूक थांबल्याने एकाच ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते़. विशेषत: बेलबाग चौक,टिळक चौक येथे गर्दीचे प्रमाण सर्वाधिक असते़ दर्शन घेतल्यानंतर मागून येणाºयांना संधी दिली पाहिजे़.
गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून पोलिसांचे प्रयत्न सुुरु आहे़. अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे़. तसेच विसर्जन मिरवणुकीत साध्या वेशातील पोलीस मोठ्या संख्येने असणार आहेत़. ते अशा चोरट्यांवर लक्ष ठेवून असणार आहे़. नागरिकांनाही काही संशयास्पद आढळले तर त्यांनी जवळ असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना सांगावे अथवा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे़, असे आवाहन डॉ. व्यंकेटेशम यांनी केले.