पोखरकरवाडीत बचत गटातील महिलांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:28+5:302021-02-24T04:10:28+5:30
घोडेगाव : पोखरकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव आणि यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं:सिद्ध संघ आंबेगाव यांच्या ...
घोडेगाव : पोखरकरवाडी (ता. आंबेगाव) येथे बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव आणि यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं:सिद्ध संघ आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटांतील महिलांच्या कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी बोलताना बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य इंद्रजित जाधव म्हणाले, उद्योजकतेच्या कौशल्य विकास प्रशिक्षणातूनच बचत गटांतील महिलांच्या संघर्षशक्तीला सरकारच्या योजनाची जोड मिळणार आहे. महिलांना मार्गदर्शन करताना यशवर्धिनी संघाचे व्यवस्थापक कुमार घोलप म्हणाले, कोरोनाकाळात बेरोजगारी वाढल्याने गावपातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने यापुढील काळात महिला बचत गटासाठी छोटे छोटे उद्योजकता कौशल्य विकास प्रशिक्षणावर भर दिला जाणार आहे.
या वेळी जनशिक्षण संस्था पुणेचे अशोक लगड, जिल्हा उद्योग केंद्राचे सुरेश उमाप, यशवर्धिनी संघाच्या अध्यक्षा योगिता बोऱ्हाडे, आदिती काळे व संघाच्या पदधिकारी अलका डोंगरे, सविता मुंडे, ललिता वर्पे, चंद्रकला भास्कर, लता दांगट, शारदा पोखरकर, सुनिता पोखरकर, विद्या गुंजाळ, मनिषा लोहकरे, कल्पना एरंडे, सुहास वाघ, सिमा कानडे, हरीभाऊ गेंगजे, शिवाजी शेटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ३१ प्रशिक्षणार्थी महिलांनी सहभाग घेतला.
23022021-ॅँङ्म-ि04 - पोखरकरवाडी येथे बी. डी. काळे महाविद्यालय आणि यशवर्धिनी ग्रामीण महिला स्वयं:सिद्ध संघ आयोजित कुक्कुटपालन प्रशिक्षण शिबिरात बोलताना प्राचार्य आय. बी. जाधव.