उत्तमनगरमध्ये लॉकडाऊन नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:09 AM2021-05-11T04:09:58+5:302021-05-11T04:09:58+5:30
शनिवार आणि रविवार हा आठवडी लॉकडाऊनमध्ये आरोग्य सुविधा सोडल्या तर सर्वच आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश असतानादेखील बऱ्याच ठिकाणी शटर ...
शनिवार आणि रविवार हा आठवडी लॉकडाऊनमध्ये आरोग्य सुविधा सोडल्या तर सर्वच आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश असतानादेखील बऱ्याच ठिकाणी शटर अर्धे ठेवून दुकाने चालूच ठेवल्याचे बघावयास मिळाले. शासनाचा आदेश धुडकावून लपून व्यवसाय करत असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कोट
दुकानात थोडी गर्दी झाली तरी कारवाई केली जाते. मात्र पथारीवाले जागोजाग बसून गर्दी करत असताना त्यांच्यावर काहीच कारवाई का केली जात नाही, याचेही निरसन प्रशासनाने करण्याची मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने केली जात आहे. जे व्यावसायिक अत्यंत काटेकोरपणे नियमांचे पालन करत आहेत, त्यांच्यावर हा अन्याय आहे.
- सारंग राडकर, अध्यक्ष, व्यापारी संघटना
कोरोना रुग्ण काही प्रमाणात कमी होत आहेत. परंतु, कोरोना अजूनही पूर्ण आटोक्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गाफील न राहता दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी दिले आहेत.
दिलेल्या वेळेनंतर लपून किंवा अर्धे शटर उघडून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.