जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने लॉकडाऊन संपेपर्यंत बारामतीत व्यवहार बंदच राहणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:41 PM2020-05-03T12:41:12+5:302020-05-03T12:41:23+5:30

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची माहिती 

Transactions in Baramati will remain closed till the end of lockdown, says ajit pawar MMG | जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने लॉकडाऊन संपेपर्यंत बारामतीत व्यवहार बंदच राहणार 

जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने लॉकडाऊन संपेपर्यंत बारामतीत व्यवहार बंदच राहणार 

googlenewsNext

पुणे - बारामतीमधील नागरिकाच्या सतर्कतेमुळे,  शिस्तीमुळे बारामतीमधील कोरोना व्हायरसचे थैमान रोखण्यात यश आले आहे. मात्र त्यानंतर देखील  सोमवार ( दि४) पासून बारामतीमधील आस्थापना,व्यवहार सुरू होणार नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. माध्यमांशी बोलताना शिरगावकर यांनी हि माहिती दिली. अधिक माहिती देताना शिरगावकर म्हणाले,  सोमवार पासून बारामतीत सर्व व्यवहार सुरू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत. एमआयडीसीतील काही कंपन्यांचा अपवाद वगळता कोणतेही व्यवहार सुरू होणार नाहीत, हि अफवाच आहे. जो कोणी अफवा पसरवेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल. 

प्रशासनाच्या वतीने सर्व बारामती मधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शासनाने परवानगी दिलेल्या एमआयडिसी मधील काही कंपन्या शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून  सुरु करण्यात येतील .अन्य कोणतेही व्यवहार अगर आस्थापना सुरू करण्यात येणार नाहीत.आतापर्यंत बारामती मधील नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य केले .तसेच सहकार्य पुढील लॉकडॉन च्या कालावधीत आवश्यक असल्याचे शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. बारामती मधील सर्व रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर ऑरेंज झोन मध्ये आले असून सोमवार पासून व्यवहार सुरू होणार असल्याच्या चर्चा सोशल मेडियावर रंगल्या होत्या. मात्र , पोलीस प्रशासनाने त्याचे खंडन केले आहे .शहरात कोणतेही व्यवहार सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने संगितले आहे. त्यामुळे बारामतीकरांना लॉकडाउन संपण्याची वाट पहावी लागणार आहे.

एमआयडीसीतील काही उद्योग ४ मे पासून सुरू  होणार शासनाने निर्धारित केलेल्या नियमात बसत असतील तेवढे बारामती एमआयडीसीतील उद्योगधंदे सोमवार (दि.४) पासून सुरु करावेत, अधिकाऱ्यांनी यासंबधी उद्योजकांना आवश्यक तेवढे सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पवार यांनी शनिवारी (दि. २) बारामतीत घेतलेल्या बैठकीत शासन नियमाप्रमाणे एमआयडीसीतील उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,  जिल्हा अद्याप  रेड झोनमध्ये आहे. परिणामी  येथील फक्त ३० टक्केच उद्योग सुरु होणार आहेत, ही बाब अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केली आहे. अप्पर पोलिस अधिक्षक जयंत मीना, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, डॉ. सदानंद काळे, डॉ. मनोज खोमणे यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, किरण गुजर, सचिन सातव, संभाजी होळकर या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान,  बारामती सध्या कोरोनामुक्त झाली आहे. परंतु पुणे रेड झोनमध्ये आहे. कोरोनाला हरवण्यासाठी  शहरातील व्यापाऱ्यांना व्यवसाय सुरु करण्यासाठी लॉकडाऊन संपेपर्यंत थांबावे लागेल, असेदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. त्यामुळे बारामतीकराना व्यवहार सुरू होण्यास  १८ मे ची वाट पहावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Transactions in Baramati will remain closed till the end of lockdown, says ajit pawar MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.