अवसरीत दोन मेपर्यंत व्यवहार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:10+5:302021-04-21T04:11:10+5:30
या कालावधीत फक्त दवाखाना, मेडिकल दुकाने, दूध, गॅस इत्यादी अत्यावश्यक व किराणा मालाची घरपोहोच सेवाच मर्यादित वेळेत चालू राहणार ...
या कालावधीत फक्त दवाखाना, मेडिकल दुकाने, दूध, गॅस इत्यादी अत्यावश्यक व किराणा मालाची घरपोहोच सेवाच मर्यादित वेळेत चालू राहणार आहेत. गावात विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तिस एक हजार रुपये दंड व पोलिस कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती उपसरपंच सचिन हिंगे, सदस्य प्रशांत वाडेकर यांनी सागितले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात भीमाशंकर सहकारी साखर कारखानावर जाणारी वाहने, दूध वाहतूक करणारे टँकर, भाजीपाल टेम्पो, खासगी कंपन्यांच्या बसेस, एस.टी.बस, इत्यादी गाड्यांची ये-जा होत असते. मात्र येथील गॅरेज बंद असल्याने ही अत्यावश्यक सेवेतील वाहने पंक्चर झाल्यास किंवा बिघडल्यास त्यांची गैरसोय होत आहे. पंक्चर काढण्यासाठी वाहन चालकांना ७ किलोमीटर अंतरावर मंचर येथे जावे लागते. तरी ग्रामपंचायतीने पंक्चर दुकानांना परवानगी द्यावी अशी मागणी वाहनचालक करत आहेत.